Download App

अभिनंदन बाबा! तिकीटासाठी एकदाही दिल्लीला न जाता…; संभाजीराजेंची शाहू महाराजांसाठी भावनिक पोस्ट

  • Written By: Last Updated:

Sambhaji Raje Chhatrapati : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Constituency) शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडून त्यांनी ही उमेदवारी देण्यात आली. तब्बल २५ वर्षांनंतर काँग्रेस या जागेवर निवडणूक लढवत आहे. महायुतीचा उमेदवार कोण याबाबत संभ्रम असतानाच काँग्रेसने पहिल्या यादीत शाहू महाराजांना उमेदवारी दिली. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट लिहिली.

लष्कर आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’मुळे बुरहानला नवे जीवन, शाळेतही परतला 

विशेष म्हणजे कोल्हापूरच्या जागेसाठी संभाजी राजे छत्रपती इच्छुक होते. मात्र वडिलांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर येताच संभाजीराजेंनी माघार घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर केली. शाहू महाराजांना उमेदवारी मिळताच संभाजीराजे छत्रपतींनी एक भावनिक पोस्ट एक्सवर लिहिली. कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.

Loksabha Election : ठरलं! मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ, महायुतीच्या बैठकीत एकमत 

संभाजीराजेंची पोस्ट काय?
“अभिनंदन बाबा… गेल्या तीन दिवसांपासून मी श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या “वाकीघोल” या अतिदुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेलं. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातलं का… पुढे दिलेला शब्द… आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचं ठरलं. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजाची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

खरंतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कोणत्याही नेत्याकडे तिकीट न मागता, केवळ जनभावना पाहून तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिध्दी पासून अलिप्त राहत जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली, त्याचंचं हे प्रमाण आहे. कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे, असंही ते म्हणाले.

follow us