राजू शेट्टी स्वबळावर ठाम, आता महाविकास आघाडीने.. उद्धव ठाकरेंच्या भेटीत नक्की काय ठरलं?

राजू शेट्टी स्वबळावर ठाम, आता महाविकास आघाडीने.. उद्धव ठाकरेंच्या भेटीत नक्की काय ठरलं?

Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महाविकास आघाडीचा (Maharashtra Politics) जागांचा पेच अजून सुटलेला नाही. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी अशी विनंती या बैठकीत करण्यात आली. परंतु, राजू शेट्टी यांनी त्यास नकार देत महाविवकास आघाडीने बाहेरून पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोकसभा माझ्या नशिबात, डावललं असतं तर इथपर्यंत आले नसते; खैरेंचा दानवेंना टोला

या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुम्ही महाविकास आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चा या भेटीनंतर सुरू झाल्या आहेत. या चर्चांमध्ये तथ्य आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीत आमची फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमचा या पक्षावर कोणताच आक्षेप नाही. या बैठकीत काही मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे, असे राजू  शेट्टी यांनी स्पष्ट केले.

राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी अशी साद त्यांना या बैठकीत घालण्यात आली. मात्र राजू शेट्टी यांनी या प्रस्तावास नकार दिला. नकार का देत आहोत याची कारणेही त्यांनी स्पष्ट केली. महाविकास आघाडीनेच बाहेरून पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी या बैठकीत व्यक्त केली. महाविकास आघाडीसमोर जागांचा काही प्रस्ताव ठेवला आहे का या प्रश्नावर मात्र राजू शेट्टी यांनी नाही असं उत्तर दिलं.

भाजपकडून खरंच ऑफर मिळाली का? राजू शेट्टी म्हणाले, मोठी ऑफर आली तरी..

आम्ही सहा जागांची तयारी केली आहे. आमचा पक्ष राज्यात सहा जागा लढवू शकतो. परंतु, याबाबतचा निर्णय आम्ही कार्यकर्त्यांवर सोपवल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी माध्यमांना दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज