Download App

Lok Sabha Election : शिर्डीत तिरंगी लढत, उत्कर्षा रुपवते यांना वंचितकडून उमेदवारी

  • Written By: Last Updated:

Shirdi Lok Sabha Utkarsha Rupwate Vanchit Bhujan Vanchit Bahujan Aaghadi candidate : वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi ) दोन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात प्रशांत रघुनाथ कदम यांना तर शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघातून उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.रुपवते या काँग्रसमध्ये होत्या. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर वंचितमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेच त्यांना शिर्डीतून वंचितने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे.

ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते, त्यांच्या पदरात…; CM शिंदेंची पवारांवर टीका

महायुतीकडून दोन टर्म खासदार सदाशिव लोखंडे हे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे उमेदवार आहेत. शिर्डीत दुरंगी लढत होईल, असे वातावरण होते. परंतु आता रुपवते याही लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आता तिहेरी सामना रंगणार आहे.

विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन, डब्बे नाहीत; फडणवीसांचा इंडिया आघाडीवर निशाणा


रुपवते यांना राजकीय वारसा

उत्कर्षा रुपवते या काँग्रेसचे नेते स्वर्गीय प्रेमानंद रुपवते यांची मुलगी आहे. उत्कर्षा ज्येष्ठ आंबेडकरी नेते आणि माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात आहे. त्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या म्हणून काम पाहत होत्या. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी अनेकदा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. पंरतु ही जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेली. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांना आता त्या वंचितकडून रिंगणात उतरल्या आहेत.

दोन चर्मकार, एक बौध्द उमेदवार

शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर येथून तीन वेळेस शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. पहिल्या निवडणुकीत रामदास आठवले हे पराभूत झाले होते. या मतदारसंघातून चर्मकार समाजातून व्यक्ती तिनदा निवडून आला आहे. त्यामुळे येथून बौद्ध समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे,अशी मागणी झाली होती. रुपवते या बौद्ध समाजातील आहेत. तर वाकचौरे आणि लोखंडे हे चर्मकार समाजातील आहेत.

रुपवते यांचा फटका कुणाला ?

रुपवते या अकोले तालुक्यातील रहिवासी आहेत. तर भाऊसाहेब वाकचौरे हेही याच तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे या तालुक्यात दोघांना मतविभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फटका भाऊसाहेब वाकचौरे यांना बसू शकतो. तसेच वंचितला मानणारी मोठी व्होट बँक या मतदारसंघातील नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव या मतदारसंघात आहेत. त्याचा फायदा रुपवते यांना होणार आहे. तिरंगी लढतीचा फटका वाकचौरे यांना मोठ्या प्रमाणात बसू शकतो.

follow us

वेब स्टोरीज