Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते, असा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्तुत्तर देत आज उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी आयोजित एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी या टीकेला उत्तर दिला आहे. या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, “आज फडणवीस यांनी मला भ्रमिष्ट म्हणाले ठीक आहे मी भ्रमिष्ट आहे की नाही जनता ठरवणार मात्र आज तुमची परिस्थिती खूप वाईट आहे, तुम्ही जनाची नाही तर मनाची ठेवा तुम्हाला दोन्ही नाही आहे हे आम्हाला माहिती आहे तुम्ही लाज लज्जा सोडलेले कोडगा माणूस आहे.
तुमच्यासाठी खूप खोल्या असतील तुम्ही त्या खोलांमध्ये काय करता ? ते आम्ही बघू नाही इच्छित. ज्याला तुम्ही कुठलीतरी खोली म्हणता ते आमच्यासाठी मंदिर आहे. त्याच खोलीत तुमचे नेते अमित शाह (Amit Shah) नाक रगडायला आले होते. त्यांनी तुम्हाला बाहेर बसवलं होते, तुम्हाला तू बाहेर बस म्हणून अमित शाह यांनी म्हटलं होते. तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बसवलं”. अशा शब्दात आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले होते
देवेंद्र फडणवीस अमरावतीमध्ये बोलताना म्हणाले की, मला असं वाटतं की आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. आज ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन, असं त्यांना मी सांगितलं होतं म्हणे. त्यांना वेड लागलं असेल. पण मला तर वेड लागलेलं नाही. पण माझा सवाल आहे. कालपर्यंत यांना भ्रम होता की, अमित शाह यांनी त्यांना कुठल्यातरी खोलीत नेऊन मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला.
धैर्यशील मोहिते पाटलांना दिलासा, निंबाळकरांनी घेतलेला ‘तो’ आक्षेप फेटाळला!
हा त्यांचा कालपर्यंतचा भ्रम होता. पण आज त्यांचा भ्रम बदलला आहे. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी एक काहीतरी ठरवावे. अमित शाह यांनी शब्द दिला की देवेंद्र फडणवीसने शब्द दिला. अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.