उद्धव ठाकरेंना वेड लागलयं, मला नाही! देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
अमरावती : “मला वाटतं आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन, असं त्यांना सांगितलं होतं, म्हणे. पण त्यांना वेड लागलं असेल. मला तर वेड लागलेलं नाही ना”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दाव्याला प्रत्तुत्तर दिले. (Devendra Fadnavis responded to Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party chief Uddhav Thackeray’s claim)
‘इंडियन एक्स्प्रेस’वृत्तपत्राला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी “आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. या दाव्यावर अमरावतीमध्ये जाहीर सभेत बोलताना फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्तुत्तर दिले.
Rohit Pawar On Ajit Pawar : हाच का तुमचा स्वाभिमान?, अजित पवारांवर रोहित पवारांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज उद्धव ठाकरे यांची पोल उघडली आहे. मला असं वाटतं की आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. आज ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन, असं त्यांना मी सांगितलं होतं म्हणे. त्यांना वेड लागलं असेल. पण मला तर वेड लागलेलं नाही. पण माझा सवाल आहे. कालपर्यंत यांना भ्रम होता की, अमित शाह यांनी त्यांना कुठल्यातरी खोलीत नेऊन मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला. हा त्यांचा कालपर्यंतचा भ्रम होता. पण आज त्यांचा भ्रम बदलला आहे. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी एक काहीतरी ठरवावे. अमित शाह यांनी शब्द दिला की देवेंद्र फडणवीसने शब्द दिला.
पवारांचा विरोध असताना रोहित पवार आमदार कसे झाले? अजित पवारांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी
उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. खुर्ची गेल्यानंतर त्यांना काहीही समजत नाही. त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात. आज यांचं खोटं उघडलं पडलं. आज मी जाहीर करतो की, आदित्य ठाकरेंना निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला होता. पुढे जाऊन त्यांनाच तो पक्ष संभाळायचा होता., त्यामुळे त्याला काहीतरी प्रशिक्षण मिळाले पाहीजे. पण त्याला मुख्यमंत्री तर सोडा, पण मंत्री बनवायचाही माझा विचार नव्हता. त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झाली नसती, असेही फडणवीस म्हणाले.