Uttamrao Jankar Secret Expose about Dhairyashil Mohite : माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून तिकीट न मिळाल्याने मोहिते पाटलांनी भाजपला राम-राम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची वाट धरली. ( Dhairyashil Mohite Patil) त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेचं तिकीट मिळालं. याच दरम्यान धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर ( Uttamrao Jankar ) यांनी देखील मोहिते पाटलांना पाठिंबा दिला आहे. तसेच याबाबत आता जानकरांनी एक गौप्यस्फोट ( Secret Expose ) केला आहे. जानकर म्हणाले की, आम्ही हा प्लॅन सहा महिन्यांपूर्वीच केला होता.
पवारांचा विरोध असताना रोहित पवार आमदार कसे झाले? अजित पवारांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी
याचा सर्व घटनाक्रम वेळापूर येथे मोहिते पाटील घराणे आणि जानकर हे एकत्र आले होते. त्यावेळी जानकर यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, भाजपने 2019 मध्ये मला उमेदवारी दिली नाही. त्यानंतर मी थेट जयंत पाटील यांचं घर गाठत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी फुटली तेव्हा मी भाजपसोबत जाणाऱ्या अजित पवार गटात होतो.
Sonu Sood: सोनू सूदला मिळाला एक नवा जिम पार्टनर; म्हणाला, ‘प्यारे मोहन…’
मात्र माझा भाजपवर राग कायम होता. त्यामुळेच दुसरीकडे मोहिते पाटील घराण्यातील उमेदवारी नाकारण्यात आलेली होती. तसेच याच दरम्यान मोहिते पाटील आणि मला माळशिरसमधून बाजूला सारत संस्कृती सातपुते यांना आमदार आणि राम सातपुतेंना सोलापूरातून खासदार करण्याचा भाजपचा प्लॅन होता. त्यामुळे 2019 ला आम्ही फसलो असलो. तरी यावेळी तसं होता कामा नये म्हणून आम्ही हा प्लॅन सहा महिन्यांपूर्वीच केला होता. आम्ही म्हणजे मी आणि मोहिते पाटलांनी भाजपला उमेदवारी मागायची.
ती मिळणार नाही हे माहित होत. त्यात मला विमानाने नागपूरला बोलावण्यात आलं. पण मी बावनकुळेंना म्हटलं की, माझ्या लोकांची दहा वर्षे वाया गेली. त्याचा हिशेब द्या. तसेच मोहिती पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा देखील प्लॅन होता. पण मी मात्र मोहिते पाटलांच्या मागे ठाम उभा आहे. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी त्यांची मिरवणूक काढल्या शिवाय राहणार नाही. असंही यावेळी जानकर म्हणाले आहेत.