Vanchit Bahujan Aghadi Candidate List : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि महाविकास आघाडीचे लोकसभेला (Lok Sabha Election) एकत्र येण्याचे सूत जुळले नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत पंचवीस मतदारसंघात वंचितने उमेदवार दिले आहेत. पण पुणे, शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी वंचितच्या गळाला दोन तगडे पहिलवान लागले आहेत. पुण्यातून मनसेला सोडचिठ्ठी वसंत मोरे (Vasant More) यांना वंचितने रिंगणात उतरविले आहे. तर शिरुर मतदारसंघातून मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) हा ‘पहिलवान’ रिंगणात उतरविला आहे. वंचितच्या तिसऱ्या यादीने पुणे, शिरुर या दोन मतदारसंघात थेट तिरंगी लढती होणार हे निश्चित झाले आहे.
Letsupp Special : उमेदवारीच्या चर्चा असतानाच भुजबळांचा बाजार कोण उठवतंय?
पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरविले आहे. दोघांनी आता प्रचार सुरू केला आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते काँग्रेसकडून लोकसभा लढण्यास इच्छूक होते. परंतु मोरेंना काँग्रेसमध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते काही दिवसांपूर्वीच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना भेटले होते. तेव्हापासून वसंत मोरे हे वंचितकडून लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा होती. आता वंचितने त्यांची उमेदवारीच घोषित केली. त्यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. कारण वंसत मोरे यांना मानणाऱ्या मतदारही काही भागात आहे. वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष आहेत. तसेच सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून येणे, त्यांना सर्व प्रकारची मदत करणे अशी त्यांची इमेज आहे. हे इमेज त्यांना मते मिळू देण्यात किती यशस्वी हे आता कळणार आहे.
सुनेत्रा पवारांची मतदारांना गळ; म्हणाल्या, बारामतीसारखाच विकास..,
शिरुर मतदारसंघातही आता तिरंगीच लढत होणार हे नक्की झाले आहे. येथून शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा उमेदवार आहेत. तर अजित पवार गट येथून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मैदानात उतरविणार आहे. त्यांची उमेदवारी अधिकृतपणे घोषित झालेली नसली तरी तेच उमेदवार असून, तशी तयारी सुरू झाली आहे. पण आता येथे वंचितने तगडा उमेदवार दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातही तिरंगी लढत होणार हे नक्की झाले आहे. विशेष म्हणजे बांदल हे गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोक कोल्हे यांचे स्टारप्रचारक होते. तेही लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते.मात्र मागील काही दिवसांपासून ते भाजपच्या स्टेजवर दिसत होते. तसंच त्यांनी नुकतीच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. परंतु आता वंचित आघाडीने त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात वंचितने बांदलच्या रुपाने तगडा मराठा उमेदवार दिलाय. आढळराव पाटील हे मराठा उमेदवार आहेत. तर अमोल कोल्हे हे माळी समाजाचे आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत दिसणार आहे.
आता फटका कुणाला बसणार ?
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला फटका बसतो. मतविभाजनाचा भाजपला फायदा होते, असा आरोप अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातो. त्यामुळे या निवडणुकीत पुणे, शिरुरमध्ये फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच बसेल, अशी राजकीय चर्चा आहे. परंतु आता दोन तगडे उमेदवार कुणाला धक्का देतात हे मतदान आणि मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल. पण वंचितने तगडे उमेदवार देऊन महायुती व महाविकास आघाडी दोघांना गॅसवर आणले आहे.