सुनेत्रा पवारांची मतदारांना गळ; म्हणाल्या, बारामतीसारखाच विकास..,

सुनेत्रा पवारांची मतदारांना गळ; म्हणाल्या, बारामतीसारखाच विकास..,

Baramati Loksabha : अजित पवारांना बारामतीत जसं मतदान पडतं तसंच मतदान इतर तालुक्यांमधून पडलं तर तुमचाही बारामतीसारखाच विकास होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी केलं आहे. दरम्यान, दौंडमध्ये आयोजित सभेत सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडत अजितदादा गटाच्या उमेदवारालाच विजयी करण्याचं आवाहन केलं आहे.

भाजपाचा माइंडगेम! रत्नागिरी घ्या पण, ठाणे किंवा कल्याण द्या; नव्या अटीने शिंदेंची कोंडी

पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, राज्यासह केंद्र सरकारमध्ये समविचार लोकं असतील तरच सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवता येणार आहेत. दादांच्या विचारांचा खासदार निवडून दिलात तर विकासाची गंगा गावागावात, गल्लीबोळात पोहोचणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

टायगर श्रॉफने खिलाडीला बनवले एप्रिल ‘फूल’! बडे मियाँसोबत केला असा प्रँक, पाहा व्हिडिओ

शाळा महाविद्यालय उभारण्याची मागणी पूर्ण करणार :

सुनेत्रा पवार यांनी यावेळी दौंडकरांना शाळा महाविद्यालयाची मागणी पूर्ण करणार असल्याचा शब्दच दिला आहे. पवार म्हणाल्या, तु्म्ही अजित पवारांना चांगल्याप्रकारे ओळखता. त्यांची कार्यपद्धती तुम्हाला माहिती आहे. अजित पवार यांनी तुमच्या तालुक्यावर किती प्रेम केलं, किती निधी दिला, हे मी सांगायला नको. आजपर्यंतचा विकास तुमच्यासमोर आहे.

नानगाव हे पूर्वीपासून सधन आहे, पुढारलेलं आहे. या गावामध्ये सगळे सुशिक्षित आणि समजुतदार आहेत. तरीही या गावात दोन गट आहेत. काही दिवसांपूर्वी महायुतीच्या वरिष्ठांनी मला उमेदवारी जाहीर केली. या विश्वासाचं मी सोनं करेन. नानगावमध्ये शाळा आणि महाविद्यालय उभारण्याची मागणी आहे. अजितदादांनी सांगितलं आहे की, तुम्ही जागा उपलब्ध करुन दिली की, महाविद्यालायचं काम लगेच सुरु करणार असल्याचं पवार म्हणाल्या आहेत.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुध्द भावजय अशी लढत होणार असून ही एकप्रकारे शरद पवार विरुध्द अजित पवार अशीच लढत आहे. त्यामुळं अजित पवारांना ही जागा राखण्यात यश येणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube