Download App

Video : भास्कर जाधवांचा थेट अजित पवारांवर घाव; म्हणाले, कुणाला किती पैसे द्यायचे हे अर्थमंत्री..

अजित पवार अर्थमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल कायम निधी कापला किवा कमी दिला अशा तक्रारी होत असतात. आताही ठाकरे गटाने आक्षेप घेतला.

Bhaskar Jadhav on Ajit Pawar : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी आता अधिवेशनात निधीचा मुद्दा उपस्थित केला आहे. अर्थमंत्री अजित पवार (Pawar) यांच्यावरच त्यांनी घणाघात केला आहे. निधी वाटपात योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार यापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी अनेकदा बोलून दाखवली होती. आता ठाकरे गटानेही तीच री ओढली आहे.

आता, भास्कर जाधव यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन अजित पवारांना लक्ष्य करत, कोणाला किती पैसे द्यायचे हे अर्थमंत्री कसा ठरवू शकतो? असा सवाल उपस्थित केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे अजित पवार यांच्याकडून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनाच निधी दिला जात असल्याचा आरोप महायुतीमधील आमदारांकडून होत असल्याचं यापूर्वीही पाहायाला मिळालं आहे.

बीड जिल्हा आर्थिक विकासानेच नाही, तर सामाजिक स्तरावरही घसरला बालविवाहांचं भयान वास्तव

अजित पवार अर्थमंत्री आहेत, मला त्यांचा आदर आहे. मात्र, मी संगमेश्वरला ते आले असताना गुहागर येथे छत्रपतींचा पुतळा उभरण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मागितला होता. मात्र, त्यांनी साधा होकार देखील दिला नाही. मला जेवणाचं निमंत्रण होतं. पण, असंख्य इंगळ्या डसल्या, कोण जेवणार तुमचं जेवण, असं म्हणत भास्कर जाधव यांनी अर्थमंत्री अजित पवारांना थेट लक्ष्य केलं.

भाजपवाले अर्थ खात्याबद्दल तक्रारी करत आहेत, शिवसेनावाले तर आधीपासूनच तक्रारी करत होते, असा अर्थसंकल्प असत नसतो. राज्याच्या तिजोरीवर कर्ज होतंय, ज्याने कर्ज काढलेलं नाही त्याच्या डोक्यावर कर्ज आहे. बोलून बोलून काय कराल, निधी देणार नाही, अरे तो तसाही तुम्ही देत नाहीत, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

कोणी एकाने चालवणारं हे खातं नाही. 7 लाख 75 हजार कोटींचा अर्थसंकल्प हा 8 लाख 15 हजारांवर घेत, 1 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. सध्या, जीएसटीवर तुमचं सर्व सुरु आहे, जीएसटी नसता तर काय होईल, असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला. एखादी आपत्ती आली, पाऊस पडला, तर पैसे कुठून आले? राखीव निधीसाठी सभागृहासमोर यावं लागलं.

follow us