Nagpur Police Recruitment : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी १३ जणांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे. (Police Recruitment ) तसंच, २ पोलीस कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलं आहे. यामुळं भरती परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे.
मोठी दुर्घटना! श्रावण सोमवारी सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी
नेमकं काय घडलं?
नागपूरमध्ये पोलीस भरतीत लेखी परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या 13 परीक्षार्थींना नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी अपात्र घोषीत केलं आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबतची तक्रार आयुक्तांकडं आली होती. या तक्रारीत म्हटलं होतं की, भरतीच्या लेखी परीक्षा दरम्यान विद्यार्थी कॉपी करत असताना त्याकडं पीएसआय आणि दोन शिपायांनी दुर्लक्ष करत त्यांना परीक्षेत गैरप्रकार करण्यास अप्रत्यक्ष मदत केली.
तुंगभद्रा धरणाचा दरवाजा गेला वाहून; पाण्याचा विसर्ग वाढला, अनेक गावच्या नागरिकांचं केलं स्थलांतर
13 परीक्षार्थींना अपात्र
पोलीस आयुक्तांनी या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत पीएसआय आणि दोन पोलीस शिपायांना निलंबित केलं होतं. त्यामध्ये आता पोलीस आयुक्तांनी 13 परीक्षार्थींना अपात्र घोषित केलं. या धडक कारवाईमुळं आता राज्यात खळबळ उडाली आहे.