तुंगभद्रा धरणाचा दरवाजा गेला वाहून; पाण्याचा विसर्ग वाढला, अनेक गावच्या नागरिकांचं केलं स्थलांतर

तुंगभद्रा धरणाचा दरवाजा गेला वाहून; पाण्याचा विसर्ग वाढला, अनेक गावच्या नागरिकांचं केलं स्थलांतर

Tungabhadra Dam : मुनिराबाद जवळील तुंगभद्रा धरणाचा १९ वा दरवाजा (क्रस्ट गेट) तुटून वाहून गेला. यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून, नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (Dam) दरम्यान, पुराचा धोका असलेल्या गावातील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

कोणीही आत्महत्येचा विचार करू नका, हात जोडून विनंती करतो; तानाजी सावंत यांचे आवाहन

तुंगभद्रा धरणाच्या दरवाजाची साखळी तुटल्याने गेट निखळला. क्रस्ट गेटमधून रात्रभर नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी साचलं आहे. कोप्पळ जिल्ह्याचे पालकमंत्री शिवराज तंगडगी आणि आमदार राघवेंद्र हितनल यांनी जलाशयाला भेट देऊन पाहणी केली. या दरवाजाची दुरुस्ती करणं सध्याच्या परिस्थितीत शक्य नसून त्यासाठी जलाशयातील ६५ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. या धरणाची क्षमता १२० टीएमसी आहे या धरणाची उंची एक हजार ६३३ फूट असून सध्या असलेल्या पाणीसाठ्यापैकी २० ते २५ फुटांपर्यंत पाणीसाठा कमी खाली करावा लागणार आहे.

मराठा आंदोलकांनी अडवली पवारांची गाडी, मंत्री विखे म्हणाले,भूमिका स्पष्ट करा, किता काळ फसवणार

तुटलेल्या १९ क्रमांकाच्या दरवाज्यातून ३५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून उर्वरित ३० दरवाजांतून एकूण एक लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणी कमी झाल्यानंतरच दरवाजा तुटण्यामागील कारण समजू शकणार आहे. त्याचप्रमाणे या दरवाजाची साखळी पूर्णपणे तुटलेली असल्याने सध्या हा दरवाजा कुठे आहे हे समजू शकले नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं. धरणातून एकाच वेळी पाणी सोडल्यास नदीकाठच्या गावांसाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार धरणातून २.३५ लाख क्यूसेकपर्यंत पाणी सोडलं जाऊ शकतं. यामुळे पिकांचंही काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube