Rain Update: राज्यात आजपासून परतीच्या पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह बरसणार

बंगालच्या उपसागरात बाप्पयुक्त वारे तयारी झाले आहेत. हळुहळू या वाऱ्यांची घुसळण होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे.

Maharashtra Rain

Weather update :हवामान विभागाकडून आज सोमवारी (ता. ७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. देशात परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून, सध्या राज्यात देखील या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दिक्षिनेतील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज देण्याता आला आहे.

भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात बाप्पयुक्त वारे तयारी झाले आहेत. हळुहळू या वाऱ्यांची घुसळण होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शक्यतो सायंकाळी किंवा रात्री पडण्याचा अंदाज आहे.

राजकारणातील मोठी बातमी! अजित पवार बारामती सोडणार; शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

मुंबई ठाण्यासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच, या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अल निनोचा प्रभाव संपल्यानंतर भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार, सप्टेंबर महिन्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र, त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

follow us