Eknath Shinde : राज्यात 29 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार मात्र त्यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धमका करत तब्बल 17 अपक्ष उमेदवारांना पक्षात प्रवेश दिला आहे.
लातूर महापालिका निवडणुकीमध्ये उभे असलेल्या 17 अपक्ष उमेदवारांनी शिवसेना शिंदे गटात (Shivsena Eknath Shinde) प्रवेश केला असून या नगरसेवकांनी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता लातूर महापालिकेत शिवसेना शिंदे गट बाजी मारणार अशी चर्चा आता जोराने राजकीय वर्तुळात सुरु आहे.
लातूर महापालिका निवडणुकीत भाजप (BJP) स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात असून काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत (VBA) आघाडी केली आहे. तर 70 पैकी 60 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने (Congress) उमेदवार दिले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 17 तर शिवसेना ठाकरे गटाने 09 जागेवर, शिंदे शिवसेनाने 11 जागेवर आणि एमआयएमने (MIM) 09 जागांवर उमेदवार दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे स्वागत; खा. लंके यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
कोणत्या अपक्षांनी पाठिंबा दिला?
श्रीकांत रांजणकर, मनोज जोशी, निलेश मांदळे, अर्चना कांबळे, अजय गजाकोष, प्रशांत बिरादार, शोभा सोनकांबळे, प्रशांत काळे, ओमप्रकाश नंदगावे, राहुल साबळे, नरसिंह घोणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लोंढे आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
