Nagpur Fraud: दिवसेदिवस फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आताही नागपुरातून एक फसवणूकीची घटना समोर आली. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांच्या नावाचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी एका वृद्ध महिलेला 23 लाखांचा गंडा घातला. आरोपींनी संबंधित वृद्ध महिलेला तिचा संबंध नसलेल्या एका प्रकरणात अटक करण्याची धमकी देत फसवणूक केली. दरम्यान, याप्रकरणी सायबर पोलिस (Cyber Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्याच ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुख घेणार निक्कीची शाळा
सविस्तर वृत्त असे की, ममता विलास बनगिनवार (प्रियदर्शनी नगर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. 15 जुलैला ममता यांना एका महिलेचा फोन आला आणि समोरच्या महिलेने साहेबांशी बोला असं म्हणत एका आरोपीला फोन दिला. समोरच्या व्यक्तीने सांगितले की, ममता यांच्या क्रमांकावरून फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या असून तुमच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचं सांगितलं.
दुसऱ्या दिवशीही व्हिडिओ कॉल आला. समोरच्या व्यक्तीने आपले नाव हेमराज कोळी असल्याचे सांगितले. तो पोलिसांच्या गणवेशात होता आणि त्याने मुंबईतील टिळक नगर पोलिस ठाण्यातून फोन करत असल्याची बतावणी केली. त्याने नरेश गोयल नावाच्या व्यक्तीचा फोटो दाखवला आणि त्याच्या गैरकृत्यांमध्ये तुमचा सहभाग असल्याचा आरोप केला.
Assembly Election : पवार-ठाकरेंची उमेदवार जाहीर करण्याची लगबग; कारणं नेमकी काय?
त्यानंतर त्याने पुन्हा कॉल केला आणि विश्वास नागरे पाटील बोलतीलस असं म्हणत एका अधिकाऱ्याला फोन दिला. त्यावेळी व्हिडिओ बंद झाला होता. समोरिल व्यक्तीने तत्काळ ममता यांना अटक करावी, अशा सचूना कोळीला दिल्या. त्यामुळं ममता घाबरल्या. 18 जुलै रोजी त्यांना परत फोन आला आणि त्यांनी ममता यांच्या मालमत्तेबाबत विचारणा करत रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा केली जाईल असं सांगत पैसे एका खात्यात जमा करण्यास सांगितले जाईल. ममता यांनी आरोपींच्या खात्यात एकूण 23.20 लाख रुपये जमा केले.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 204, 318(4), 319(2), 336(3), 338, 340(1), 340(2), 351(2) आणि 61(2) अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.