Download App

मोठी बातमी! ST च्या ताफ्यात 25 हजार स्वमालकीच्या बसेस येणार, खरेदीस अजितदादांची परवानगी

Pratap Sarnaik : पुढील पाच वर्षात 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी

  • Written By: Last Updated:

Pratap Sarnaik : पुढील पाच वर्षात 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मान्यता दिली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.

एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी 5000 या प्रमाणे येत्या 5 वर्षात 25 हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या असल्याची  माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

2025-26 अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी सध्या एसटी महामंडळाकडे केवळ 14 हजार 300 बसेस असून त्यापैकी 10 वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या 10 हजार बसेस आहेत. त्या पुढील 3-4 वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. अशी माहिती त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना दिली.

तसेच दरवर्षी 5 हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 25 हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना महामंडळाची असल्याची देखील माहिती त्यांनी  अर्थमंत्री अजित पवारांना दिली.

दरवर्षी 5 हजार नवीन बसेस याप्रमाणे सन 2029 साली या  25 हजार बसेस व 5 हजार इलेक्ट्रिक बसेस मिळून 30 हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल भविष्यात ” गाव तिथे एसटी… मागेल त्याला बस फेरी..!” आपणं देऊ शकतो. अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मोठी बातमी! पाच वर्षांनंतर सुरु होणार कैलास मानसरोवर यात्रा , परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा

“आज आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटी वर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल मी त्यांचा शतशः आभार आहे.” असं देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

follow us