मोठी बातमी! पाच वर्षांनंतर सुरु होणार कैलास मानसरोवर यात्रा , परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा
Kailash Mansarovar Yatra 2025 : पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा कैलास मानसरोवरची यात्रा (Kailash Mansarovar Yatra 2025) सुरु होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री (Vikram Misri) 26 आणि 27 जानेवारी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते. या दौऱ्यात कैलास मानसरोवर यात्रेवर चर्चा झाली असून 2025 च्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू होईल असे सांगण्यात आले आहे.
या दौऱ्यात दोन दिवसांच्या चर्चेनंतर उन्हाळ्यात कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. भारत आणि चीनमधील परराष्ट्र सचिव-उप-परराष्ट्र मंत्री यंत्रणेच्या बैठकीसाठी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बीजिंगला भेट दिली होती.
ऑक्टोबरमध्ये कझान येथे झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांच्या स्थितीचा आढावा घेतला आणि संबंध स्थिर करण्यासाठी पावले उचलण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा यात्रा सुरु करणे हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
India and China decided to resume the Kailash Mansarovar Yatra in the summer of 2025; the relevant mechanism will discuss the modalities for doing so as per existing agreements: MEA pic.twitter.com/fgb3cyX5Io
— ANI (@ANI) January 27, 2025
विमानसेवाही सुरु होणार
यात्रेबरोबरच दोन्ही देशांमध्ये थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत या बैठकीत तत्वतः करार झाला आहे. दोन्ही बाजूंचे संबंधित तांत्रिक अधिकारी लवकरच यासाठी चर्चा करून नवीन अपडेट देणार आहे.
Jio Coin देणार का Bitcoin ला टक्कर? एका क्लीकवर जाणून घ्या कसा होणार फायदा
तसेच भारत-चीन तज्ञांची बैठक देखील आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये जलविज्ञानविषयक डेटाची तरतूद पुन्हा सुरू करण्यावर आणि सीमापार नद्यांशी संबंधित इतर सहकार्यावर चर्चा केली जाईल.