Download App

बीडच्या गुन्हेगारीचा रोज एक अंक; जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची मारहाण, तरुण रक्तबंबाळ

बीड ग्रामीण पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या साक्षाळ पिंपरी येथे जमिनीच्या वादातून मारहाण झाली असून तरुण गंभीर जखमी.

  • Written By: Last Updated:

Beed land Dispute : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना काही थांबयचा नाव घेत नाहीत. (Beed) रोज अशा घटना समोर येत आहेत. साक्षाळ पिंपरी येथे शेतजमिनीच्या वादातून माजी सरपंचाने एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

बीड ग्रामीण पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या साक्षाळ पिंपरी येथे जमिनीच्या वादातून वाद विकोपाला गेल्यानंतर गावच्या माजी सरपंचाने संबंधित तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बीडमधील लोटस खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

तु आता तुझ्या बापाला घेऊन ये;बीडच्या सावकार अन् व्यावसायिकाची रेकॉर्डिंग व्हायरल

पीडित कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप करत सांगितले की, वारंवार प्रयत्न करूनही पोलिस तक्रार दाखल करून घेत नाहीत. राजकीय दबावामुळे पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिला, असा आरोप करत पीडितांनी थेट पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी आज बीडच्या पोलीस अधिक्षकांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे.

त्यांनी म्हटलं की, ‘अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आमच्यावर अन्याय झाला आहे आणि पोलिस केवळ राजकीय दबावामुळे गप्प आहेत.’ या घटनेबाबत बीड ग्रामीण पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. मात्र, स्थानिक पातळीवर या घटनेबाबत संतापाची लाट असून, नागरिकांनी गुन्हेगारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

follow us