Download App

अजितदादांना अर्थखातं; गोगावले, शिरसाटांचा पत्ता कट : भाजपच्या बड्या नेत्याचे मोठे गौप्यस्फोट

मुंबई : शिंदे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर मार्गी लागल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दिल्ली वारीनंतर त्यांच्या गटाला अर्थ आणि सहकार खातं मिळालं आहे. याशिवाय पुण्याचं पालकमंत्रीपदही अजितदादांच्या वाट्याला गेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर हा तोडगा निघाल्याचं भाजपच्या एका बड्या नेत्यानं माध्यमांशी बोलताना सांगितलं. (A tug-of-war continues between CM Eknath Shinde and ncp and bjp)

याशिवाय मंत्रिमंडळ विस्तारातून रायगडचे आमदार भरत गोगावले आणि औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याचंही या बड्या नेत्यानं सांगितलं. भरत गोगावले आणि संजय शिरसाट या वादग्रस्त चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपचा विरोध आहे. गोगावले यांनी नुकतचं आदिती तटकरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं होतं. त्यानंतर भाजपचा विरोध आणखी तीव्र झाला. मागील काही दिवसांपासून याच दोन नावांमुळे विस्तार रखडला होता, अशीही माहिती या नेत्याने दिली.

शिंदेंचे आमदार अस्वस्थ :

राष्ट्रवादीची सरकारमध्ये एन्ट्री झाली, त्यानंतर त्यांच्या 9 आमदारांना तात्काळ मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना या विस्तारात स्थान देण्यात आले नव्हते. मागील 10 ते 11 महिन्यांपासून शिवसेनेतील आमदारांकडून मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी होत आहे. मात्र अद्यापही विस्तार न झाल्याने शिंदेंच्या गटातील आमदार अस्वस्थ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

बच्चू कडू पुन्हा ‘वेट अँण्ड वॉच’च्या भूमिकेत; 18 तारखेला जाहीर करणार निर्णय

आधी ठाकरे सरकार पाडल्याचा ठपका, त्यानंतर गद्दारचा टॅग लागणं, अपात्रतेची तलावर लटकलेली असणं आणि अशा परिस्थितही मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी वर्षभराची वाट पाहायला लागणं. अशात अजित पवारांच्या एन्ट्रीने मंत्रिपदाची संख्या कमी झाली आहे. या सर्व गोष्टी शिंदेंच्या आमदारांना अस्वस्थ करत असल्याचं चित्र आहे. या दरम्यान, पुन्हा एकदा अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे जाण्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदेंची आक्रमक भूमिका :

दरम्यान, खातेवाटपासंदर्भात गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने भेटीगाठी सुरू आहेत. मात्र, शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपावर एकमत होऊ शकले नाही. 2 खात्यांवरून तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळs मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाला विलंब होत आहे. परिणामी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरावे लागते. यामुळे अजित पवारांना आता थेट दिल्लीत धाव घेतली.

Aanibaani: लग्न न झालेल्या माणसाची नसबंदी…; प्रवीण तरडेंच्या विनोदी आणीबाणीचा ट्रेलर प्रदर्शित

भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदाबाबतही पेच निर्माण झाला आहे. यावरुनही शिंदे यांनी भाजपला सावध केलं असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. गोगावले आणि शिरसाट या दोन चेहऱ्यांना सहभागी करून घेतले नाही तर गटाला सोबत ठेवणे त्यांना कठीण जाईल. बहुतांश आमदारांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या मोठ्या संख्येने आमदार उद्धव ठाकरे यांच्यात सामील झाले, तर शिंदे यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अडचणीत येईल आणि त्यांच्या पक्षालाही आणखी एक फूट पडेल. यातून भाजपचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे भाजपने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, असे शिवसेनेच्या एका मंत्र्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

Tags

follow us