Download App

Video : डीसीपी डॉ. संदीप भाजीभाकरे यांची मदत; अपघातग्रस्ताचे वाचवले प्राण, सर्वत्र होतय कौतुक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोटारसायकलस्वाराने एका वृद्ध महिलेला धडक दिली, ज्यामुळे ती महिला किरकोळ जखमी झाली.

  • Written By: Last Updated:

Deputy Commissioner of Police Dr. Sandeep Bhajibhakare : वानवडी येथील जगताप डेअरी चौकाजवळ रस्त्याच्या कडेला झालेल्या अपघाताला पोलीस उपायुक्त (डीसीपी) डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या तत्परतेमुळे (Bhajibhakare ) अपघातानंतर अपघातग्रस्त मोटारसायकलस्वाराचा जीव वाचला. ही घटना काल ( १४ डिसेंबर) रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली. भाजीभाकरे यांच्या या कामामुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Sangli Accident : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोटारसायकलस्वाराने एका वृद्ध महिलेला धडक दिली, ज्यामुळे ती महिला किरकोळ जखमी झाली. मोटारसायकलस्वार त्याच्या दुचाकीवरून पडला आणि अपघातानंतर लगेचच त्याला झटका आला. अपघात घडला तेव्हा प्रत्यक्षदर्शी डीसीपी भाजीभाकरे यांनी तातडीने मदत केली. त्यांनी तरुणाची तब्येत पाहून लगेच प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या घटनेबाबत पत्रकारांशी बोलताना डीसीपी डॉ. भाजीभाकरे म्हणाले, ‘आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करणे हे पोलिस अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. अशा प्रसंगात प्रत्येकाने पुढे यावे आणि अपघातग्रस्तांना शक्य होईल तेव्हा मदत करावी, कारण वेळेवर मदत झाल्यास जीव वाचू शकतात असं ते म्हणालेत.

follow us

संबंधित बातम्या