Download App

अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन

मुख्यमंत्री कार्यालयामार्फत ही माहिती देण्यात आली. एक्स खात्यावरून फोटो पोस्ट करून म्हटलंय की, अभिनेत्री प्राजक्ता माळी

  • Written By: Last Updated:

Prajakta Mali Meet Devendra Fadnavis : भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदन सादर केलं.

प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय, ते निषेधार्ह; सचिन गोस्वामी

मुख्यमंत्री कार्यालयामार्फत ही माहिती देण्यात आली. एक्स खात्यावरून फोटो पोस्ट करून म्हटलंय की, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असं कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलं.

पत्रकार परिषदेत काय म्हटलं होतं?

कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांत जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. परळीच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी काम केलं आहे. यापुढेही काम करत राहणार. याआधीही अनेक राजकीय नेत्यांबरोबर, मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग त्या फोटोचा संदर्भ घेऊन तुम्ही कुणाहीबरोबर असंच नाव जोडणार का? हे एक महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाटतं. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. ते बोलले ते इतकं कुत्सित आहे असं ती म्हणाली होती.

follow us