Download App

शेतजमिनीचं काम अन् 5 लाखांची लाच; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात

Vinod Khirolkar :  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सरकारी कार्यलयात भ्रष्टाचार वाढत असल्याने एसीबीकडून (ACB) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात

Vinod Khirolkar :  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सरकारी कार्यलयात भ्रष्टाचार वाढत असल्याने एसीबीकडून (ACB) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. नुकतंच परभणी (Parbhani) जिल्ह्यात एसीबीने मोठी कारवाई करत महिला क्रीडा अधिकाऱ्या्ला लाच घेताना अटक केली होती. एसीबीच्या या कारवाईनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

तर आता पुन्हा एकदा राज्यात एसीबीने मोठी कारवाई करत लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यांस अटक केली आहे. माहितीनुसार, एसीबीने ही कारवाई छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) केली आहे. एसीबीने छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांस 5 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. एसीबीने जिल्हाधिकारी कार्यलयात कारवाई करत उपजिल्हाधिकाऱ्याला अटक केली आहे. विनोद खिरोळकर (Vinod Khirolkar) असं अटक करण्यात आलेल्या उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. अव्वल कारकुनामार्फत ही लाच घेण्यात येत असताना एसीबीने ही कारवाई केली आहे.

ठाण्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू…, देशात 1045 सक्रिय रुग्ण; जाणून घ्या ताजे अपडेट

एसीबीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यानी मोठ्या लाचेची मागणी केली होती. निवासी जिल्हाधिकाऱ्यानी संबधित तक्रारदाराकडून 23 लाख रुपये घेतले होते मात्र त्यानंतर पुन्हा 18 लाखांची मागणी तक्रारदाराकडे करण्यात आली होती. त्यातील 5 लाख रुपयांची लाच घेताना आरोपी उपजिल्हाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत ही लाच घेतली जात असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.

follow us