Ajay Baraskar On Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांच्यावर अजय महाराज बारसकर (Ajay Baraskar)यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन (Maratha Reservation)भरकटवलं. त्यांच्यामुळं मराठा समाजाचं आतोनात नुकसान झालं आहे. आपण मराठा असून 2006 पासून मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यावर कायदेशीर लढाई लढत असल्याचे यावेळी अजय महाराज बारसकर यांनी यांनी सांगितले. ज्यांना ओबीसीच्या (OBC)कोट्यातून जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरसेवक व्हायचं होतं, अशा गावातल्या चारदहा लोकांसाठी मनोज जरांगे यांची ही लढाई होती. जरांगे यांची लढाई ही राजकीय होती. ही गरजवंत गरीब मराठ्यांच्या लेकराबाळांसाठी नव्हती आणि असणारही नाही असाही आरोप यावेळी अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे.
आणखी एक काँग्रेसीला CM शिंदे आयात करणार? संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर
अजय महाराज बारसकर म्हणाले की, मराठा समाजाला कायदेशीररित्या आरक्षण मिळण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून लढत आहोत. त्याला लवकरच यश मिळणार आहे. जरांगे यांना मराठा समाजाने नेतृत्व दिलं. ते त्यांच्या पारदर्शकपणामुळे दिले. त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे दिले. हा माणूस कधी फुटणार नाही, हा माणूस समाजाचं वाटोळं करणार नाही. पण जरांगे यांच्या काही कृतींमुळे त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. लोणावळा आणि वाशीमध्ये जरांगेंनी बंद खोलीमध्ये चर्चा केली आणि दाराआड चर्चा करुन डील केली, असा आरोप त्यावेळीही आपण आरोप केला होता.
आमदार शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयावर कर्जतकर नाराज…कर्जत बंद ठेवत केला निषेध
मनोज जरांगे हे सारखे पलट्या मारतात. आरक्षण मिळालं नाही तरीही आझाद मैदानावर जाणार आणि आरक्षण मिळालं तरीही गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जाणार,पण वाशीमध्ये बंद दाराआड चर्चा करुन जरांगे पाठिमागे गेले. त्यावेळी नेमकी काय डील केली? हे जरांगे यांनी सांगावे. जरांगे यांनी त्याचं उत्तर दिलं नाही, असाही आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला.
मराठा आरक्षणाचा लढा हा आता राजकीय झाला आहे. अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या निर्णायक बैठकीमध्ये मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना अक्षरश: शिव्या घातल्या असाही आरोप त्यांनी यावेळी केला. त्याआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.
त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली? याचं रेकॉर्डींग जगासमोर आणा असंही आव्हान बारसकर यांनी केलं आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बोलताना त्याचं रेकॉर्डींग करण्यात आलं पण त्या दिवशी अशोक चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नेमकं काय झालं? हे देखील समोर यायला हवं असंही यावेळी बारसकर महाराज म्हणाले.