जरांगेंना एकदाच भेटलो नंतर फोनही नाही; आरोपांवर शरद पवारांचा खुलासा
Sharad Pawar News : मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना एकदाच भेटलो नंतर फोनही केला नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून मनोज जरांगेंच्या मागे शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी आज खुलासा केला आहे. ते पुण्यात बोलत होते.
‘मनोज जरांगेंना सरकारने अतिरेक्यासारखं वागवलं’; उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका
शरद पवार म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना मी पहिल्यांदाच आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर भेटायला गेलो होतो. मराठा आंदोलनासाठी ऐक्य टिकावं असं मी जरांगेंना सांगितलं होतं. त्यानंतर मी आत्तापर्यंत जरांगे यांना भेटलो नाही, आणि कधी फोनही केला नाही, असा खुलासा शरद पवारांनी केला आहे. तसचे आज जबाबदार लोकं इतकं पोरकट बोलतात हे मी कधी पाहिलं नसल्याची खोचक टीकाही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
तसेच राजेश टोपे यांच्यावर आरोप लावले ते १०० टक्के चुकीचे आहेत. काहीही चौकशी करा आमची काही हरकत नाही. कर नाही त्याला डर कशाला. एक फोन मी केला असेल तर मला आला असेल तर दाखवा. बारामतीत लोकांच्या बोलण्यातून वातावरण चांगलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात काय होत ते पाहू, असं शरद पवार म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सखोल चौकशी करा : विधानसभा अध्यक्षांचे गृहविभागाला निर्देश
दरम्यान, मनोज जरांगे आता वेगळी भाषा बोलू लागले असून याआधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे जे बोलत असायचे तसंच मनोज जरांगे बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच मनोज जरांगे यांनी माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे आणि बिनबुडाचे असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळून लावले होते. मराठा समाजाला माझ्या कार्यकाळात आरक्षण देण्याचं काम मी केलं असून मराठा माझ्यामागे उभा असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
मनोज जरांगेंचं रिमोट शरद पवारांच्या हाती…
मनोज जरांगेंचं रिमोट दुसऱ्यांच्या हातात आहे, हा कुठल्याही सहकाऱ्याला विचारत नव्हता. मनोज जरांगेंचा रिमोट शरद पवारांच्या हातात आहे मी मरणाला भीत नाही त्यामुळे थेटपणे सांगत आहे. त्याचं कारण म्हणजे पुण्यात जरांगेंचे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. जो शरद पवार याआधी मराठा आरक्षणाला विरोध करीत होता. आता त्याचे कार्यकर्ते बॅनर का लावत आहेत. बाकीचं सभा कोणी घेतल्या हे सर्वांनाच माहित आहे, सभेसाठी करोडो रुपये, जेसीबी कुठून आले चेक करा? असा आरोप संगिता वानखेडेंनी केला होता.
https://www.youtube.com/watch?v=XuLEV9soiF8