‘मनोज जरांगेंना सरकारने अतिरेक्यासारखं वागवलं’; उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका

‘मनोज जरांगेंना सरकारने अतिरेक्यासारखं वागवलं’; उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका

Udhav Thackeray News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलचं घमासान सुरु आहे. अशातच आता मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर काल उपोषण मागे घेतलं आहे. तर साखळी उपोषणाची घोषणाही जरांगे यांनी केली आहे. अखेर मनोज जरांगेंच्या भूमिकेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर जळजळीत टीका केली आहे. मनोज जरांगे यांना सरकारने अतिरेक्यासारखं वागवलं असल्याची टीका ठाकरेंनी केलीयं. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मनोज जरांगेंशी काही देणं-घेणं नाही, पण त्यांचा बोलवता धनी शोधणारच : देवेंद्र फडणवीसांचा इशारा

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यावेळी इंडिया आघाडीची बैठक होती त्याच दिवशी मनोज जरांगे 1 ऑगस्टला बसले होते. त्याचदिवशी मनोज जरांगे यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधूर, गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यावेळी महिलांचे डोकेही फोडण्यात आले होते. त्यावेळी जसं काय अतिरेकीच घुसले, अशी वागणूक पोलिसांकडून आंदोलकांना देण्यात आली होती.

चव्हाणांनंतर काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का : कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा

मनोज जरांगे यांना सरकारने अतिरेक्यासारखीच वागणूक दिली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारने जसं अतिरेकी ठरवलं तसं मनोज जरांगे यांनाही अतिरेकी ठरवणार का? जरांगेंना तुम्ही गुन्हेगार ठरवणार का? जरांगेंना विश्वासात घेऊन त्यांच्या मागण्यांच्या मागे न लागत तुम्ही जरांगेंच्या मागे का लागता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

टोनी ॲबॉट, आयुष्मान खुराना, पुलेला गोपीचंद ‘राष्ट्र उभारणीच्या’ चर्चेसाठी एकत्र; मुलाखतीदरम्यान खुलासा

सध्या विविध आरोप केले जात आहेत. या आरोपांवरुनही उद्धव ठाकरे यांनी थेट भाष्य करीत राज्य सरकारला खुलं आव्हानंच दिलं आहे. सरकारकडे फोन टॅपिंगसंदर्भआतील निष्णांत लोकं आहेत. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस, आमचे आणि मनोज जरांगे यांचे फोन कॉल्स तपासावेत, तसेच एसआटी चौकशीही चिवटपणाने करावी, काहीच सोडून नये, अशी मागणीच उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=XuLEV9soiF8

follow us
  • fb
  • instagram
  • youtube