Ajit Pawar Again Wink His Eye : फडणवीसांनी डिसेंबर महिन्यात राज्याचे तेव्हाचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी गाजर हलवा असे संबोधत टीका केली होती. मात्र, या विधानाऐवजी चर्चा झाली होती ती विधानभवनाच्या परिसरात झालेल्या पत्रकार परिषदेतील अजित पवारांच्या डोळा मारण्याची. त्यानंतर आज (दि.15) पुन्हा अजित पवारांनी याच कृतीची पुनरावृत्ती पाहण्यास मिळाली. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजितदादांची प्रत्येक फाईल माझ्याकडे येणार! नाराज आमदारांना फडणवीसांचा ‘शब्द’
त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी राज्याचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळ परिसराच्या आवारात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत असताना डोळा मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओची बरीच चर्चादेखील झाली होती. एवढेच काय तर, यातून अनेक अर्थदेखील काढण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा अजित पवारांनी डोळा मारला आहे.
कृषीमंत्री होताच धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी; वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
त्यावेळी नेमकं काय झालं होते?
डिसेंबर महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यावर अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते. तेव्हा तिथे उद्धव ठाकरे आले असता अजित पवार एकदम बाजूला झाले आणि उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास सुरूवात केली. नेमकं त्याचवेळी अजितदादांनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध दिशेला पाहून कोणाला तरी डोळा मारला. त्यावेळी अजित पवारांनी डोळा कोणाला मारला आणि कशासाठी मारला हे कळू शकलं नाही. मात्र, या प्रसंगाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
कृषीमंत्री होताच धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी; वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
आज पुन्हा डोळा मारण्याची पुनरावृत्ती
त्यानंतर आज (दि.15) रोजी नाशिक येथील पत्रकार परिषदेत अजितदादांनी डोळा मारला. पत्रकार परिषदेत अजितदादांना पक्ष आणि चिन्हाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकांपूर्वी पक्षाचं चिन्ह तसेच नावाबाबत तुम्हाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल असे थेट उत्तर अजितदादांनी दिले. मात्र, उत्तर संपताच अजितदादांनी त्यांच्या डाव्या बाजूला मान करत कुणाला तरी डोळा मारला. आता हा डोळा त्यांनी कुणाकडे बघून मारला हे काही समजू शकलेले नाही. मात्र, त्यांच्या या कृतीची पुन्हा एकदा खमंग चर्चा सुरू झाली आहे.
लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी
अंतर्मन म्हणालं म्हणून काकींची भेट घ्यायला गेलो
बंड करत भाजप-शिंदेंसोबत गेलेले अजितदादा काल (दि. 14) पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. त्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, माझ्या अंतर्मनाने सांगितल्याने मी काल काकींची भेट घेण्यास गेलो होतो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असल्याचे सांगत आपली वर्षानुवर्ष भारतीय संस्कृती आहे. परंपरा आहे. कुटुंबाला आपण महत्त्व देतो. आजी-आजोबा, आई-वडील आणि काका-काकूंनी आम्हाला पवार कुटुंबीयांची परंपरा शिकवली आहे. त्यामुळे काकींची भेट घेत काकींच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे ते म्हणाले.
जे विरोधकांची मोट बांधत होते त्यांचीच बोट फुटली; राष्ट्रवादीतील बंडानंतर CM शिंदेंचा पवारांना टोला
सुप्रिया, साहेब सर्वच होते
या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मी ज्यावेळी तेथे गेलो त्यावेळी घरी शरद पवार साहेब होते. काकी होती, सुप्रिया होती असे सांगत या भेटीत कुणाबरोबरही राजकीय विषयांवर चर्चा झाली नसल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले.
पक्ष अन् चिन्हाची गुगली, अजितदादांनी ‘सेफ’ उत्तर देत मारला डोळा!#AjitPawar @AjitPawar4Mah #Ajitdada #ajitpawarncp pic.twitter.com/WGG1rQBMmA
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 15, 2023