अजितदादा अन् रोहित पवार एकाच गाडीतून शरद पवारांच्या निवासस्थानी, पुणे महानगरपालिकेसाठी मोठा निर्णय?

Sharad Pawar Birthday  :  राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून

Sharad Pawar Birthday

Sharad Pawar Birthday

Sharad Pawar Birthday  :  राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून पुणेसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असे संकेत देखील गेल्याकाही दिवसांपासून मिळत आहे. यातच आता एक मोठी घडामोड घडल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवासानिमित्त (Sharad Pawar Birthday) त्यांच्या दिल्लीतील (Delhi) निवासस्थानी स्नेहभोजनांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह देशातील आणि राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली. स्नेहभोजनानंतर अजितपवार आणि रोहित पवार एकाच गाडीतून बाहेर निघाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तक्रवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवासानिमित्त एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पुणेसह इतर महानगर पालिकांसाठी दिलजमाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे महानगर पालिका (Pune Municipal Corporation) निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती झाली तर राजीनामा देणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी दिला आहे. यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेत आपली बाजू देखील मांडली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीसाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राज्यातील राजकारणात सुरु आहे.

शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवासानिमित्त त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनांचे कार्यक्रमात अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल पटेल देखील उपस्थित असल्याने या कार्यक्रमात आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवासानिमित्त लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह अनेक व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले होते.

December 11 Horoscope : आज होणार आर्थिक फायदा? जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण आणि कृषी मंत्री शरद पवार 12 डिसेंबर रोजी 85 वर्षांचे होतील.यावेळी तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत रॉय, भाजप नेते डी. पुरंदेश्वरी आणि केंद्रीय मंत्री रवीन सिंग बिट्टू हे देखील उपस्थित होते. इतर अनेक खासदारांनीही शरद पवार यांची भेट घेतली.

Exit mobile version