Download App

Video: जबाबदारी वाढली की मूड बदलावा लागतो; जयंतरावांचे कौतुक करताना अजितदादांची फटकेबाजी

विधानसभेत अधिवेशन सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पावर अजित पवार बोलले. त्यांनी यावेळी विरोधकांनी काय टीका केली यावर भाष्य केलं.

Image Credit: Letsupp

Assembly Session : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी लीक झाला असं म्हणत टीका केली. दरम्यान, अर्थसंकल्पात अंदाजे काही बातम्या किंवा काही माहिती माध्यम देत असतात. (Assembly Session) आणि त्यामध्ये काह गैर नाही. ते माध्यमांचं कामच आहे. (Ajit Pawar) मात्र, सुमारे ९ वेळा अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी असे प्रश्न उपस्थित करणं हे कठीण आहे अशा शब्दांत अर्थमंत्री अजित पवार यांनी काहीशी खंत व्यक्त करत झालेल्या टीकेला उत्तर दिलं. तसंच, जयंतराव आपण राज्याचा ९ वेळा अर्थसंकल्प मांडला. आता मी दहावेळा मांडला. त्यामुळे तुमचा रेकॉर्ड मी मोडला आहे असा उल्लेखही अजित पवारांनी यावेळी केला.

 ज्येष्ठ सदस्य आहेत जखमा झाल्या, श्वासही कोंडला; टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडनंतर १० जण रुग्णालयात

विरोधी पक्षांकडून काही सुचना केलेल्या आहेत. त्यामध्ये काही कामाच्या सुचना असतील तर त्याचं स्वागतच आहे. त्यांचा जरूर विचार करणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, काही हरकत नाही. हे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी याबद्दल प्रश्न उपस्थित करणं हे लोकशाहीत चांगलीच गोष्ट आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

मनुष्य स्वभावच तसाया अर्थसंकल्पाने त्यांचा लोकसभेतील उत्साह संपवला; फडणवीसांचं जयंत पाटील अन् ठाकरेंना उत्तर

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मला आश्चर्य वाटत की विरोधात असलं की अर्थसंकल्पावर टीका करायची. सत्तधारी असलं की अर्थसंकल्पाचं समर्थन करायचं. आता मला दोन्ही बाजून अर्थसंकल्पा मांडण्याची संधी मिळाली आहे. परंतु, हा मानवी स्वभावच आहे. त्यामुळे त्यावर तरी काय बोलाव असं म्हणत अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजी केली.

 

 

 

follow us

वेब स्टोरीज