या अर्थसंकल्पाने त्यांचा लोकसभेतील उत्साह संपवला; फडणवीसांचं जयंत पाटील अन् ठाकरेंना उत्तर

या अर्थसंकल्पाने त्यांचा लोकसभेतील उत्साह संपवला; फडणवीसांचं जयंत पाटील अन् ठाकरेंना उत्तर

Devendra Fadanvis Criticize Opponent after Ajit Pawar Presented Budget : खोट्या अफवा पसरवून लोकसभेमध्ये काही जागा मिळवल्याने विरोधकांना थोडा उत्साह आला होता. मात्र या अर्थसंकल्पाने त्यांचा तो उत्साह देखील संपवला आहे. असा टोला फडणवीसांनी (Devendra Fadanvis) लगावाला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवारांनी एकत्रित माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी फडणवीस बोलत होते.

Quotation Gang चा ट्रेलर आऊट; सनी म्हणाली, या चित्रपटाने मला पूर्ण…

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाचे लोक बोलत होते. मात्र त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता आणि चेहऱ्यावरती नूर नव्हता. त्यांचे चेहरे उतरलेले होते. केवळ टीका करत होते. तसेच अर्थसंकल्पावर काय बोलायचं ते अगोदरच लिहून आणतात. त्यामुळे अर्थसंकल्प कसाही सादर केला असता.

अर्थसंकल्प म्हणजे लबाडा घरचं आवतन, नुसती आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर; ठाकरेंचे टीकास्त्र

तरी त्यांची हीच प्रतिक्रिया असली असती. खोट्या अफवा पसरवून लोकसभेमध्ये काही जागा मिळवल्याने त्यांना थोडा उत्साह आला होता. मात्र या अर्थसंकल्पाने त्यांचा तो उत्साह देखील संपवला आहे. असं म्हणत जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या अर्थसंकल्पावरील टीकेला फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

https://fb.watch/s_lIRX7ybs/

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलतांना ते म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आश्वासने आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही दणका त्यांना दिला, त्याने सत्ताधाऱ्यांचे डोळे थोडेस किलकिले झालेले दिसत आहे. तही देखील जनता त्यांच्या थांपावर विश्वास ठेवेल, असं मला वाटत नाही, महाराष्ट्रातील जनता ही सुजाण, सज्ञान आणि स्वाभिमानी आहे. त्यांनी कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र ओरबडून गुजरातला नेण्याचं षडयंज्ञ उघड झालंय, महाराष्ट्र गुजरातच्या पाठी गेला आहे, असं ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज