Download App

अजितदादांचा राष्ट्रवादी पक्षावर दावा; आगामी सर्व निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवणार

 Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर अजितदादांनी पत्रकार परिषद घेतली आहे. ते म्हणाले की,  मोदी साहेब मजबुतीने देशाला पुढे नेत आहेत. विकासाचा एकमेव मुद्दा पाहून आम्ही हा निर्णय घेतला. शिवसेनेसोबत आम्ही जाऊ शकतो तर भाजपसोबत जायला काय हरकत आहे आणि नागालँड मध्ये सुद्धा भाजपसोबत गेलो तर महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत जायला काही अडचण नाही, असे ते म्हणाले.

बहुतेक आमदारांना माझा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी आहोत. आगामी सर्व निवडणुका आम्ही घड्याळ या चिन्हावरच लढवणार आहोत, असे म्हणत अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला आहे.

अजित पवार म्हणाले की, “देशाला मजबूत नेतृत्वाची गरज आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी मी माझी भूमिका मांडली. सत्तेत सहभागी झाल्यानंतर आम्ही केंद्रीय निधी महाराष्ट्राला मिळवून देणार.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी आहोत.  राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदार माझ्यासोबत आहेत.  राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावर आम्ही आगामी जिल्हा परिषद. पंचायत समिती, महापालिका, नगरपरिषद निवडणूक एकत्र लढवणार आहोत”.

Ajit pawar : शुक्रवारीच पदाचा राजीनामा दिला; बंडामागचं सत्य उघड करत अजितदादांचा गौप्यस्फोट!

आमच्याकडे संख्याबळ आहे, सर्व आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही पक्ष म्हणून आलो आहोत. आम्ही सर्व वरिष्ठांनाही कळविले आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व दिले जाते. आमचा पक्ष 24 वर्षांचा असून तरुण नेतृत्व पुढे आले पाहिजे असेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितले.

तसेच आज आम्ही महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विभागांबाबत नंतर चर्चा केली जाईल. राष्ट्रीय स्तरावरील सर्व बाबींचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. अनेकजण आपल्यावर टीका करतील पण आपण त्याला महत्त्व देत नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही कार्यरत राहू. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमचे बहुतांश आमदार आमच्या निर्णयावर समाधानी आहेत. या सरकारला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत पाठिंबा दिला आहे. आम्ही सर्व निवडणुका राष्ट्रवादीच्या नावावरच लढू, असे अजितदादा म्हणाले.

Raj Thackeray : पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. इतर देशांमध्येही तो लोकप्रिय आहे. प्रत्येकजण त्यांना पाठिंबा देत असून, त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करतात. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही त्यांच्यासोबत (भाजप) लढवू आणि त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे अजितदादांनी सांगितले.

 

 

Tags

follow us