आयएल आणि एफएस प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल ईडीने चौकशी केली. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील यांना रात्री उशिराने ईडी कार्यालयाबाहेर सोडण्यात आले. याचदरम्यान, महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांचे फोन आले पण विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा फोन आला नसल्याची नाराज प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी आज दिलीय.
पंढरपूर, अक्कलकोटचा चेहरा-मोहरा बदलणार, विकास आराखड्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही विचारण्यात आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फोन कशाला मी जयंत पाटलांना प्रत्यक्ष जाऊन भेटणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
अजित पवार म्हणाले :
जयंत पाटील यांच्या ईडीचौकशीप्रकरणी मी कोणालाही फोन केला नाही. कोणाल फोन करण्यापेक्षा भेटल्यावरच समक्ष बोलणार आहे. जयंत पाटील आणि मी जेव्हा भेटू त्यानंतरच बोलणार आहे.
अशातच जयंत पाटलांना आलेल्या नोटीशीनंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रदेश कार्यालयात दाखल झाले होते. यामध्ये विशेषत: सांगलीतून असंख्य कार्यकर्ते आले होते. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक बडे नेत्यांनी काल मुंबईतील प्रदेश कार्यालयात हजेरी लावली होती.
Aditya Singh Rajput : 17 व्या वर्षी करिअरची सुरुवात ते यशस्वी अभिनेता : कोण होता आदित्य सिंग राजपूत?
जयंत पाटील म्हणाले :
मला महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचे फोन आले आहेत. मी कोणत्याही विशेष नाव घेत नाही. सर्वच नेत्यांचे मला ईडीच्या चौकशीप्रकरणी फोन आले आहेत. मात्र, अजित पवार यांचा फोन आलेला नाही.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार काल प्रदेश कार्यालय परिसरात दिसून न आल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार आले नाहीत, हीच एक चर्चा काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरु होती. अखेर जयंत पाटील यांची ईडीने केलेल्या चौकशीनंतर अजित पवार यांनी साधी विचारपूसही केली नसल्याचं दिसून आलं. मात्र, आज अखेर अजित पवारांनी मी जयंत पाटलांची थेट भेट घेणार असल्याचं सांगून चर्चांना पूर्णविराम दिला आहे.