Akshay Kardile is active again : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी विजय मिळवला व त्यांनतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत मतदार संघात परतल्यानंतर पुन्हा एकदा जनता दरबारच्या माध्यमातून जनतेची काम हाती घेतली आहे. विजय हा जनतेचा आहे आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास देखील आमदार अक्षय कर्डिलेंनी व्यक्त केला आहे. अक्षय यांनी राजकीय मैदान गाजवल्यानंतर आता जनता दरबारच्या माध्यमातून जनतेची सेवा महत्त्वाची असल्याचे दाखवून दिले आहे.
निकाल लागल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी अक्षय कर्डिले पुन्हा मतदारसंघाच्या कामात सक्रिय झाल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीत पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महायुतीच्या जोरदार रणनीतीसह कर्डिले कुटुंबावरील जनतेचा विश्वास पुन्हा एकदा मतपेटीतून दिसून आला आणि अक्षय कर्डिले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलांवर गुन्हा दाखल
मुख्यमंत्री फडणवीसांसह मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेत मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत केली चर्चा
निवडणुकीतील विजयानंतर कर्डिले यांनी थेट मुंबई गाठली. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेत मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तात्काळ अहिल्यानगर मध्ये परतत त्यांनी पुन्हा जनसंपर्क आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, निवडून आल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्या निवासस्थानी समर्थक, कार्यकर्ते जमा झाले होते. विजय हा जनतेचा आहे आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,अशी भावना अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केली.
