Download App

मीच चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला; बदलापूर घटनेतील नराधम अक्षय शिंदेची डॉक्टरांसमोर कबुली

बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेमध्ये धक्कादायक खुलासे समोर डॉक्टर, शाळेचे कर्मचारी, फॉरेन्सिक टीमचे अधिकारी अनेकांची साक्ष नोंदवण्यात आली.

  • Written By: Last Updated:

Badlapur Sexual Assault Case :  बदलापूरमधील एका शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण ऑगस्ट महिन्याच्या मध्यात उघडकीस आलं होतं. या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीचा तपास पूर्ण झाला आहे. (Badlapur) लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने वैद्यकीय तपासणी सुरु असताना डॉक्टरांसमोर आपला गुन्ह्यातील सहभाग कबूल केला होता, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. याचा उल्लेख पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आहे.

Delhi CM : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचा आज शपथविधी; जुन्या निष्ठावंतांनाचं मंत्री म्हणून संधी

डॉक्टरांसमोरची कबुली

डॉक्टर, शाळेचे कर्मचारी, फॉरेन्सिक टीमचे अधिकारी यांच्यासह २० जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. तपास करताना आरोपीने डॉक्टरांसमोर आपण गुन्ह्यात सहभागी होतो, असा कबुलीजबाब दिल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित डॉक्टर आणि आरोपी यांचा जबाब नोंदवला आहे. याशिवाय वैद्यकीय चाचणीचा अहवाल आणि २० जणांची साक्ष हे आरोपी अक्षय शिंदेवर असलेले आरोप सिद्ध करण्यास मदत करणारे ठरतील.

हैवानासारखं वागायचा

अक्षयच्या पहिल्या पत्नीच्या जबाबानंतर आता दुसऱ्या पत्नीनेही त्याच्या विरोधात जबाब नोंदवला आहे. अक्षय हा अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा, असा आरोप तिने केला आहे. अक्षयच्या या विकृतपणाला कंटाळूनच आपण माहेरी निघून गेल्याचंही तिने जबाबात म्हटलं आहे. याआधी अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीनेही अक्षय हा शरीरसंबंध प्रस्थापित करताना हैवानासारखा वागत असल्याचं सांगितलं होतं. आता दुसऱ्या पत्नीने देखील त्याचा विकृतपणा उघड केल्यामुळे त्याच्या गळ्याभोवती आवळलेला फास अधिक घट्ट झाला आहे.

राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याची गरज, कुठं होणार पाऊस?

सीसीटीव्ही फुटेज

आरोपींच्या कबुलीजबाबात दोन आरोपपत्रे तयार करण्यात आली आहेत. त्यांची एकत्रित पृष्ठसंख्या ५०० हून अधिक झाली आहे. पुरावा म्हणून घटनेच्या दिवशी शाळेच्या मुख्य गेटमधून आत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेजही जोडण्यात आले आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करण्याची मागणी एसआयटीच्या टीमने राज्य सरकारकडे केली आहे. एसआयटीच्या प्रमुख असलेल्या आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वात बदलापुरातील अत्याचार प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यात आला.

 

follow us