Amit Shah Discussions with Vinod Tawade on Maratha Reservation and Bihar Election : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे मुंबई येथे शुक्रवारी रात्री आगमन झाले आहे. विमानतळ मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. शाह हे 29 आणि 30 ऑगस्ट 2025 या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते लालबागच्या राजा आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट देऊन गणेशाचे दर्शन घेणार आहेत. त्याचवेळी त्यांनी विनोद तावडे यांच्यासोबत मराठा आरक्षण आणि बिहार निवडणुकांवर चर्चा केल्याचं बोललं जात आहे.
कुणाला आनंदी-आनंद तर कुणासाठी संमिश्र कसा आहे? सर्व राशींसाठी आजचा दिवस जाणून घ्या…
मराठा आरक्षण आणि बिहार निवडणुकांवर चर्चा :
मराठा आंदोलनाची त्यांनी बैठकीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विनोद तावडे यांच्यासोबत बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी मराठा आंदोलनाबाबत माहिती घेतली. मराठा आंदोलन आणि बिहार निवडणूक तसेच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे हे ऐन गणेशोत्सवामध्ये मुंबईमध्ये लाखो आंदोलकांसह पोहोचले असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
Video : टपऱ्या, हॉटेल्स बंद.., लासलगाव ग्रामस्थांनी मुंबईत आंदोलकांसाठी ट्रकने आणल्या भाकरी
अमित शाह हे दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येत असतात. त्याचप्रमाणे ते याही वर्षी मुंबई दाखल झाले आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये आज लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. या दरम्यान त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या विनोद तावडे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा आंदोलन बिहार निवडणूक तसेच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या बैठकीत नेमकं काय ठरलं? या आंदोलनावर काही तोडगा यातून निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.