Download App

असे गैरसमज पसरवणं निश्चितच गंभीर; जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर काय म्हणाले अमोल कोल्हे?

सध्याचे राजकारण, समाजकारण याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती

  • Written By: Last Updated:

Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजप प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चेची राळ बसते न बसते तोच ते अजित पवार यांच्यासोबत जाणार अशा चर्चा सुरू झाल्या. (Amol Kolhe) त्यातच त्यांच्या “माझं काही खरं नाही”, या वक्तव्याने या संशयाला अधिक हवा दिली आहे. त्यावर आता त्यांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे.

जयंत पाटील पक्षात नाराज? शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट, त्यांनी बारामतीतच…

राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी सातत्याने अफवा पसरविल्या जात आहेत. एखाद्या व्यक्तीविषयी अशा पध्दतीने गैरसमज पसरविणे निश्चितच गंभीर आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

सध्याचे राजकारण, समाजकारण याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात न्यायालयाने दिलेला निर्णय हा कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोकाटे प्रकरणी न्यायलयाने केलेली टिप्पणी सामान्य माणसाला अगतिक करणारी आहे. न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न आहे. मस्साजोगची घटना असो किंवा अहिल्यानगर येथील १८ वर्षाच्या युवकाची हत्या असो. या सर्व घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत असंही ते म्हणाले.

follow us