जयंत पाटील पक्षात नाराज? शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट, त्यांनी बारामतीतच…

जयंत पाटील पक्षात नाराज? शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट, त्यांनी बारामतीतच…

Sharad Pawar On Jayant Patil Unhappy In NCP : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) पक्षात फूट पडण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळ अधिकच तीव्र झाली आहे. शरद पवारांचे जवळचे सहकारी जयंत पाटील (Jayant Patil) पक्ष सोडून अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांकडून यावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

जयंत पाटील नाराज असल्याच्या प्रश्नावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली (NCP Politics) आहे. तुम्ही त्यांचं उत्तर छापलंय, असं देखील शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. जयंत पाटील यांनी बारामतीतच उत्तर दिलंय, असं देखील शरद पवार म्हणाले आहेत. जयंत पाटलांच्या नाराजीवर शरद पवारांनी हे उत्तर दिलंय.

पुण्यात ‘बुलेट’राजांना वाहतूक पोलिसांचा दणका, 1 हजार 768 सायलेन्सरवर थेट बुलडोझर फिरवला

मल्हार अन् झटका वाद निर्माण झालाय. याला जेजुरीच्या विश्वस्तांनी पाठिंबा देखील दिलाय. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही? हे राष्ट्रीय प्रश्न नाहीत, अशी देखील टीका शरद पवार यांनी केलीय.

बीडवर बोलताना शरद पवार म्हणाले की, बीडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून हीच अवस्था आहे. मी स्वत: तिथे गेलो आहे. मी तिथे उभे केलेले सदस्य, आमदार निवडून आलेले नाही. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम आज गेले काही महिने आपल्याला दिसत आहेत, असं देखील शरद पवार म्हणाले आहेत.

मोठी बातमी ! केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या ताफ्यावर हल्ला, हॉकी स्टिकने फोडली कारची काच

राज्य सरकारने जो कोणी कायदा हातात घेतो, त्याच्यावर कारवाई करावी, असं देखील शरद पवार म्हणाले आहेत. राज्यात काही ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे. यापूर्वी बीडमध्ये अशी परिस्थिती कधीच नव्हती. बीड जिल्हा सर्वांना सोबत घेऊ जात होता. तिथं सामंजस्याचे वातावरण होतं, असं देखील शरद पवारांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube