Download App

मोठी बातमी! भंडाऱ्याच्या आयुध निर्माण कंपनीत स्फोट; ५जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

स्फोट झाला. त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

  • Written By: Last Updated:

Explosion at Ordnance Manufacturing Company : भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाला. त्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला. (Explosion ) दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले. आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरीक भेदरून गेले. या स्फोटाचे कारण काय आहे हे समोर आलेले नाही.

दरमहा 10 हजार SIP करा अन् व्हा करोडपती; सोपं गणित समजून घ्या!

४ किलोमीटरपर्यंत आवाज

या स्फोटाची भीषणता मोठी होती. त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. नागरीक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. भंडारा शहराजवळील जवाहरनगर परिसरात सरकारचा आयुध निर्माण कारखाना आहे. तर, स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले

या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जवाहरनगरातील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्सनमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या कंपनीत दारू गोळा तयार करण्यात येतो.

एसडीआरएफला पाचारण

जिल्हा नियंत्रण कक्ष येथे प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सकाळी अंदाजे दहा वाजता आयुध निर्माणी जवाहर नगर येथे एक स्फ़ोट झालेला असून त्यामध्ये काही काम करणारे कर्मचारी हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळावर अग्निशमन पथक पोलीस विभाग तहसीलदार व इतर आवश्यक प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत. सदरचे अनुषंगाने अधिकची मदत म्हणून एसडीआरएफ यांना पाचरण करण्यात आले आहे.

follow us

संबंधित बातम्या