नव्या दमाने…नव्या आयुधांसह…नवनिर्माणास सज्ज; राज ठाकरे नवी घोषणा करणार?

नव्या दमाने…नव्या आयुधांसह…नवनिर्माणास सज्ज; राज ठाकरे नवी घोषणा करणार?

मुंबई : आज (दि.9) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) 17 वा वर्धापन दिन आहे. आज मनसेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यातच आता मनसेनं एक पोस्टर (Poster)शेअर केलं आहे. त्यात नव्या दमाने… नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज अशा आशयाचं पोस्टर आपल्या ट्वीटर (Twitter)अकाऊंटवरुन शेअर केलंय. त्यामुळं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)नेमकी काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. त्याचवेळी ठाकरेंकडून काही नवीन घोषणा (New announcement)करणार का? याकडंही सर्वांच्या नजरा आहेत.

वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सभा होणार आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यामध्ये साजरा केला जाणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पातून पर्यावरणपूरक विकासाचं लक्ष्य

मनसेनं आपल्या ट्वीटमध्ये एक पोस्टर शेअर केली आहे. त्यामध्ये आपल्या वर्धापन दिनाची माहिती दिली आहे. त्या पोस्टरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेमध्ये बोलताना दिसत आहेत. तसेच पोस्टरमध्ये नव्या दमाने… नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज! अशा आशयाचं पोस्टर मनसेनं शेअर केलं आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आहे. शिवाय राज्यातील राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, अर्थसंकल्पीय अधिवेशन, राजकीय नेत्यांच्या विधानं, त्यावरून सुरू असलेला वाद, अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि नुकताच संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube