Dombivli Boiler Explosion मध्ये 7 जण दगावले, 48 गंभीर जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Dombivli Boiler Explosion मध्ये 7 जण दगावले, 48 गंभीर जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Boiler Explosion in Midc Area In Dombivli 6 Dead : डोंबिवली एमआयडीसी परिसरात ( Midc Area In Dombivli ) आज (दि.23) दुपारी दोनच्या सुमारास एका केमिकल कंपनीत बॉयलरचे स्फोट झाले. हे स्फोट एवढे भीषण होते की, यामध्ये अडकलेल्या लोकांपैकी 6 जणांचा होरपळून मृत्यू तर 4-5 कामगार गंभीर जखमी असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता या घटनेत मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 48 जण गंभीर जखमी आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला आहे. या स्फोटचे हादरे अनेक किलोमीटर पर्यंत जाणवले. त्यामुळे परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत.

संजयकाका टेन्शनमध्ये; सांगलीत भाजपला पराभवाचा चाहूल लागलीय का?

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं आहे. या घटनेची माहिती कळताच उद्योग मंत्री उदय सामंत हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेची तात्काळ दखल घेत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मात्र घटनेच्या तीन तासानंतर देखील हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

18 लॅटिट्यूड मॉलमध्ये बच्चे कंपनींची ‘धमाल मस्ती’; बुडूख ज्वेलर्स ‘फन कार्निवल’ची उत्साहात सांगता

या घटनेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एनडीआरएफ एसडीआरएफ यांच्याकडून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमध्ये आग लागण्याचे नेमकं कारण काय होतं? हे तपासून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. असं आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान डोंबिवलीच्या घटनेमुळे 2016 मध्ये झालेल्या स्फोटाची पुनरावृत्ती झाली आहे. या घटनेमध्ये 12 जणांनी आपल्या जीव गमावला होता. तर आजूबाजूला परिसरात राहणाऱ्या 215 जणांच्या नुकसान झालं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज