सुनेत्रा पवारांना थेट राजीनामा, शिंदेंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ; आनंद परांजपे शिवसेनेच्या वाटेवर?

ठाणे-पालघरचे समन्वयक आनंद परांजपे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

Untitled Design 24

Untitled Design 24

Anand Paranjape on the way to Shiv Sena? : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींना आता आणखी वेग आला असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ठाणे-पालघरचे समन्वयक आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, या सर्व घडामोडींमध्ये आता शिवसेनेच्या वाटेवर आनंद परांजपे? हा प्रश्न राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आला आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत पक्षाची सूत्रे आपल्या हाती घेतली. मात्र त्यानंतर पक्षातील अस्वस्थता सातत्याने समोर येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. त्यातच आता आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यानी राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी उघड समोर आली आहे.

आनंद परांजपे यांनी आपल्या राजीनाम्याच्या पक्षाच्या सरचिटणीस, प्रवक्त्या, ठाणे-पालघर समन्वयक आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. पक्षाने दिलेल्या संधीबद्दल त्यांनी आभार मानले असले, तरी अत्यंत मोजक्या शब्दांत दिलेला हा राजीनामा अनेक राजकीय संकेत देऊन गेला आहे. विशेषतः विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आधीपासूनच होती.

निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांना गांभीर्य नव्हते का? खासदार शरद पवारांचा सवाल

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती. मात्र पक्षाने झिशान सिद्दीकी यांना संधी दिल्यानंतर आनंद परांजपे नाराजी वाढल्याचे बोलले जाऊ लागले. त्याआधी राज्यसभा निवडणुकीत देखील त्यांना संधी मिळाली नव्हती. सलग दोन महत्वाच्या निवडणुकांमध्ये डावलले गेल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये होती. अखेर या नाराजीचा उद्रेक राजीनाम्याच्या रूपाने झाल्याचे मानले जात आहे.

सोशल मीडियावर भावना व्यक्त करताना आनंद परांजपे यांनी 14 वर्षांचा प्रवास जड अंतकरणाने थांबवत नव्या वाटेवर पॉल टाकत आहे, असे म्हटले. या एका वाक्यानेच त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाची उत्सुकता अधिक वाढली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनदा भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, आनंद परांजपे यांची राजकीय कारकीर्द मुळतः शिवसेनेतूनच झाली होती. शिवसेना एकसंघ असताना त्यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये ते पुन्हा स्वगृही परतणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे आणि पालघर परिसरात आनंद परांजपे यांचे मजबूत संघटन आणि कार्यकर्त्यांवरील पकड लक्षात घेता, त्यांची संभाव्य घरवापसी शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सध्या संघटन विस्तारावर भर देत असताना, परांजपे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची एंट्री पक्षासाठी महत्वाची मनाली जात आहे. आता आनंद परांजपे अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करतात का, आणि त्यानंतर ठाणे-पालघरच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version