निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांना गांभीर्य नव्हते का? खासदार शरद पवारांचा सवाल
देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी काही मंत्र्यांच्या प्रतिकात्मक कृतींवर देखील अप्रत्यक्ष टीका केली.
MP Sharad Pawar’s question : देशात निर्माण होत असलेल्या आर्थिक परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारसह सर्व नागरिकांनी परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचा देखील उल्लेख करत, देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले.
पवार म्हणाले, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची चर्चा देशभर सुरू आहे. त्यांनी जे सांगितलं त्याची नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे. संसदेचे अधिवेशन सम्पल्यानंतर देखील मी याबाबत विनंती केली होती. परिस्थितीत किती गाम्भीर्य आहे, हे समजून घेतलं पाहिजे. देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी काही मंत्र्यांच्या प्रतिकात्मक कृतींवर देखील अप्रत्यक्ष टीका केली. आज सकाळपासून मी पाहतोय, कुणी मोटारसायकलवरून जात आहे, कुणी चालत ऑफिसला जात आहे. एका मंत्र्याने तर जाहोर केलं की, पूर्वी 17 गाड्या होत्या, आता त्या कमी करून 8 केल्या. हे सगळं पाहताना धक्का बसतो. या गोष्टींकडे फक्त प्रतिकात्मकतेने नाही, तर गंभीर दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. त्याचप्रमाणे पंत्रप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्याला उपस्थित राहावं, मागील ४ वर्षांत ज्या सर्वपक्षीय बैठक झाल्या त्याला पंतप्रधान हजर नव्हते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुचाकी प्रवासावर देखील पवारांनी प्रतिक्रिया दिली. आज ते दुचाकीवरून आले, पण उद्या काय होणार हे पाहावं लागेल. हे एक-दोन दिवसांसाठीचं प्रतीकात्मक पाऊल आहे का, हे देखील समजून घ्यावं लागेल असं ते म्हणाले. स्वतःच्या सुरक्षेविषयी बोलताना पवार म्हणाले की, मला बुलेटप्रूफ गाडी देण्यात आली होती, पण मी ती घेतली नाही. मी स्वतःची गाडी वापरतो. पुढे एक आणि मागे एक अशा दोन-तिनचं गाड्या असतात. त्यात देखील आणखी कपात करण्याची विनंती मी केली आहे. यावेळी विशेष सुरक्षा विभाग, मुंबई यांनी दिलेलं पत्र देखील त्यांनी वाचून दाखवलं.
NEET म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा जुगार; शिक्षण व्यवस्थेवर राज ठाकरे यांचा घणाघात
रुप्याच्या घसरणीवर भाष्य करताना पवारांनी निवडणुकांनंतर घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. रुपयाची किंमत का घसरतेय, याचा गंभीर विचार झाला पाहिजे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही निर्णय घेण्यात आले. पण निवडणूक सुरू असताना देशाच्या नेतृत्वाला ही गांभीर्य जाणवलं नव्हतं, असा आरोप त्यांनी केला. सोमनाथ मंदिराच्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या उपस्थितीचा देखील त्यांनी उल्लेख केला. सोमनाथ मंदिराला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे पंतप्रधान तिथे गेले होते. पण देशातील परिस्थिती गंभीर आहे आणि त्याचं गांभीर्य सर्वांनी दाखवायला हवं, असं ते म्हणाले.
सोन्याच्या खरेदीबाबत बोलताना पवारांनी संयमी भूमिका घेतली. सोनं खरेदी करणं चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण खर्च कमी करण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात आर्थिक मंदी येण्याची शक्यता नाकारत असतानाच त्यांनी नागरिकांच्या सहकार्यावर भर दिला. लोकांनी परिस्थितीच गांभीर्य ओळखलं तर आर्थिक मंदीची वेळ कदाचित येणार नाही. नागरिकांचं सहकार्य महत्वाचं आहे, असे ते म्हणाले.
महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर थेट दोषारोप करण्यास त्यांनी टाळलं. युद्धामुळे चिंतेचं वातावरण आहे. तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे महागाई वाढतेय. याचा पूर्ण रोष सरकारला देणं योग्य ठरणार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. दरम्यान, साखर निर्यातबंदी आणि शेतकरी प्रश्नांवर बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली. कांदा हा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचं महत्वाचं पीक आहे. मात्र त्यांच्या घामाला योग्य किंमत मिळत नाही. राजू शेट्टी भेटायला आले होते, उसाबद्दल चर्चा झाली. ऊस उत्पादकांना योग्य दर मिळत नाही. आता साखर कारखाने 100 दिवससुद्धा चालत नाहीत. ही परिस्थिती ऊस उत्पादकांसाठी अत्यंत घातक आहे, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.