Ankush Kakade On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांना आज 29 जानेवारी रोजी अंतिम निरोप देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह राज्यातील अनेक नेते बारामतीत विद्या प्रतिष्ठान मैदानावर जमले होते. अजित पवार यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले.
तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात सुरु असल्याने अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 12 डिसेंबर रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) एकत्र करुन अजित पवार (Ajit Pawar) शरद पवार यांना गिफ्ट देणार होते असं अंकुश काकडे यांनी सांगितलं.
माध्यमांशी बोलताना अंकुश काकडे म्हणाले की, राजकारणात माझी आणि अजितदादांची सुरुवात एकाच वेळी झाली. दोघेही जिल्हा बँकेत एकत्रित निवडून आलो. मग राजकारणात अनेक वर्ष काम केल. दादा हे आमचे नेते नेहमी राहिले. दादांना राजकीय वारसा होता मात्र त्यांनी महाराष्ट्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मला राहून राहून दुख होतंय की, अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, असा आग्रह त्यांनी मला केला होता.
अजितदाद मला म्हणाले होते, विठ्ठल शेठ, मणियार, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहे, साहेबांशी बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक कशा होतील यासाठी प्रयत्न करा. आम्ही जे प्रयत्न करता येणं शक्य आहे ते आम्ही करत आहे.
महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खरं तर 12 डिसेंबर रोजी आम्ही एकत्र येणार होतो पण येऊ शकलो नाही. ठीक आहे. निवडणुकीनंतर एकत्र येऊ असं अजित पवार यांनी अंकुश काकडे यांनी सांगितलं. त्यामुळे आता अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
अशा संधी वारंवार मिळत नाहीत अन्…, ‘दलदल’ वेब सीरिजवर आदित्य रावल नेमकं काय म्हणाले?
