Download App

HSC : बारावी नापास विद्यार्थ्यांना पुन्हा संधी; पुरवणी परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

Application process begins for 12th Supplementary Examinations : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी 25 मे ला जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला. तर विभागनिहाय निकालात यंदा देखील कोकण विभागानेच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला आहे. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

कवितेतून हसविणारे रामदास आठवले जेव्हा कार्यकर्त्यावर भडकतात

त्यानंतर आता बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी मिळणार आहे. कारण बारावी नापास विद्यार्थ्यांसाठई घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज 29 मे पासून सुरू झाली आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.

Salman Khan : भाईजानला लग्नाची मागणी घालणारी ‘ती’ तरुणी कोण? जाणून घ्या…

बारावीच्या पुरवणी परीक्षेस पुनः परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज घेण्यात येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना www.mahahscboard.in या संकेतस्थव्यद्वारे अर्ज भरावा लागेल. फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइनद्वारे घेता येणार आहे.

Actor Sonu Sood भाजपकडून निवडणूक लढवणार? गजेंद्रसिंग शेखावत यांची घेतली भेट

श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट 2023 आणि फेब्रुवारी-मार्च 2024 या दोनच संधी उपलब्ध असतील. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कालावधीत कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags

follow us