Actor Sonu Sood भाजपकडून निवडणूक लढवणार? गजेंद्रसिंग शेखावत यांची घेतली भेट

Actor Sonu Sood भाजपकडून निवडणूक लढवणार? गजेंद्रसिंग शेखावत यांची घेतली भेट

Actor Sonu Sood met Punjab BJP incharge Gajendra Singh Shekhawat : अभिनेता सोनू सूद याने रविवारी भाजपचे पंजाबचे प्रभारी असलेले गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. याची माहिती स्वतः गजेंद्रसिंग शेखावत यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे. सोनू सूद भाजपकडून निवडणूक लढवणार असे देखील बोलले जात आहे.

गजेंद्रसिंग शेखावत यांनी ट्विटमध्ये सांगितले की, प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी आज दिल्ली कॅम्प कार्यालयात भेट घेतली. ही एक शिष्टाचार भेट होती. यामध्ये सविस्तर चर्चा झाली. अशी माहिती गजेंद्रसिंग शेखावत यांनी ट्विटमध्ये दिली. त्यामुळे सोनू सूद भाजपकडून निवडणूक लढवणार या चर्चांना जणू दुजोराच मिळाला आहे.

IPL 2023 Final GT vs CSK: …तर ट्रॉफी गुजरातला जाणार ; ‘इंद्रदेव’ ठरवणार यंदाचा चॅम्पियन

अभिनेते सोनू सूद पंजाबच्या मोगा येथील राहवासी आहेत. त्यांच्या बहिणीने मोगा या मतदारसंघातून 2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक कॉंग्रेसकडून लढवली होती. मात्र आता सोनू सूद आणि गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट झाल्यानंतर आता सोनू सूद आगामी निवडणूक मोगा मतदारसंघातून भाजपकडून लढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान या अगोगर देखील अनेकदा सोनू सूदची भाजपशी जवळीक असल्याचं दिसून आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube