कवितेतून हसविणारे रामदास आठवले जेव्हा कार्यकर्त्यावर भडकतात

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 29T112917.206

Ramdas Aathwale :  शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे भाषण झाले. त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच यावेळी ते बोलत असताना एका कार्यकर्त्यावर चांगलेच चिडलेले पहायला मिळाले.

रामदास आठवले हे आपल्या खास कवितांसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या कवितांना संसदेमध्ये मोठ-मोठ्या नेत्यांना हसवत चिमटे काढले आहे. पण काल मात्र ते अचानक चिडलेले दिसून आले. रामदास आठवले हे भाषण करत असताना एक कार्यकर्ता अचानक घोषणा द्यायला लागला. यावरुन आठवले त्या कार्यकर्त्याला रागवताना दिसून आले.

Letsupp Special : आमदार-मंत्र्यांचे PA ते राज्याचे नेते; पडद्यामागून येत Politics गाजवणारे चेहरे

जागेवर थांब आगाऊपणा करु नको. असे लोक असल्यामुळे पार्टीचा सत्यानाश झाला आहे. तू आला तर इथं बसलं पाहिजे. अशी पार्टी असते का?. आगाऊपण कराल तर पार्टीतून आऊट करुन टाकेल, असे आठवले म्हणाले.

Video : ‘सिर्फ एक बंदा काफी है’ मनोज वाजपेयीची लढाई

दरम्यान, यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील सोबत येण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही उगाच इकडे तिकडे फिरु नका. असं फिरुन तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही माझ्याकडे या. मी तुम्हाला बीजेपीकडे घेऊन जातो. आपण दोघे भाजप व नरेंद्र मोदींसोबत राहूया. उद्धव ठाकरेंसोबत राहून तुम्हाला काही मिळणार नाही, असे आठवले म्हणाले.

Tags

follow us