पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra State Public Service Commission) अध्यक्षपदी सध्याचे राज्य पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्त होण्याची शक्यता होती. मात्र, एमपीएससीचे सदस्य म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे (Dr. Dilip Dnyaneshwar Pandharpatte) यांची आयेगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एमपीएसचीचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांचा कार्यकाळ 19 सप्टेंबर रोजी रोजी संपला. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली समितीने आलेल्या अर्जांची छानगी करून तीन नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. या तिघांमध्ये रजनीश सेठ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने आणि दिलीप पांढरपट्टे यांची यांचा समावेश होता, अशी माहीती सुत्रांनी दिला. त्यानंतर राज्यपालांनी डॉ. पांढरपट्टे यांची नियुक्ती करत अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे. आयोगावर पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत डॉ. पांढरपट्टे अतिरिक्त कार्यभार पाहणार आहेत.
Pankaja Munde : जर निवडणुकीत तिकीट दिलं नाही तर.. पंकजा मुंडेंचा भाजपला रोखठोक इशारा
डॉ. पांढरपट्टे हे 1987 च्या राज्य सेवा बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी कोकण विभागात उपजिल्हाधिकारी, कोकण भवनात उपायुक्त म्हणून काम केले. सन 2000 मध्ये त्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावर बढती मिळाली. 2015 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत नियुक्ती झाली.
सिंधुदुर्ग, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे आणि सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलं. यानंतर त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव, अमरावती विभागाचे आयुक्त अशी जबाबदारी सांभाळली आहे. मार्च महिन्यात त्यांची MPSC सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती.
पांढरपट्टे हे कवी, लेखक, गझलकार असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिध्द आहेत.