Download App

एसटी बॅंकेवर झेंडा फडकावताच सदावर्तेंकडून नथुराम गोडसेंच्या समर्थनात घोषणा…

स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेवर एसटी कामगारांचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा झेंडा फडकला आहे. स्टेट सहकारी बॅंकेवर पॅनल निवडून येताच जयश्री पाटील-सदावर्ते यांनी नथुराम गोडसे यांच्या समर्थनात घोषणा दिल्या आहेत. सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत सदावर्तेंचा कष्टकरी जनसंघ पॅनल आणि शरद पवारांच्या कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये चुरस लागल्याचं पाहायला मिळालं होत. अखेर गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. दरम्यान, विजयानंतर जयश्री पाटील सदावर्ते यांनी नथुराम गोडसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन करीत गोडसेंचा जयघोष केला आहे.

World Cup 2023: अहमदाबादमध्ये फायनल, तर या 12 शहरांमध्ये होणार वर्ल्ड कपचे सामने

निवडणुकीपूर्वीच जयश्री पाटील-सदावर्ते आणि गुणरत्न सदावर्ते यांनी महात्मा गांधी आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांच्याबद्दल विधान केले होतं. त्यांनी नथुराम गोडसेचा आदरार्थी उल्लेख करत त्यांच्याबरोबर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी नथुराम गोडसे यांचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत लावला होता. तर दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेमध्ये टीका केली होती.

Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या…

स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून निवडणुकीत गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलने एकहाती विजय मिळवला आहे. निवडणुकीत सदावर्तेंच्या कष्टकरी जनसंघ पॅनलने शरद पवारांच्या कामगार संघटनेच्या पॅनलचा धुव्वा उडवला आहे. 19 पैकी 19 जागांवर सदावर्तेंच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

दरम्यान, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस कामबंद आंदोलन ठेवलं होतं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने गुणरत्न सदावर्ते न्यायालयात केस लढताना पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता बॅंकेच्या विजयानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून सदावर्तें यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नथुराम गोडसेंच्या फोटोला अभिवादन केलं होतं. सदावर्तेंनी शरद पवारांवरही गलिच्छ भाषेेत टीका केली होती. त्यानंतर आता विजयानंतर नथुराम गोडसेंच्या समर्थनात त्यांनी घोषणा दिल्याने ही चर्चेचा विषय ठरत आहे.

Tags

follow us