World Cup 2023: अहमदाबादमध्ये फायनल, तर या 12 शहरांमध्ये होणार वर्ल्ड कपचे सामने

  • Written By: Published:
World Cup 2023:  अहमदाबादमध्ये फायनल, तर या 12 शहरांमध्ये होणार वर्ल्ड कपचे सामने

एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतात खेळला जाणार आहे. मात्र, यावर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. वास्तविक, 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात 12 मैदानांवर खेळवला जाणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीचे सामने ईडन गार्डन कोलकाता आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. (world-cup-2023-venues-schedule-and-latest-sports-news-details)

या मैदानांवर खेळवले जातील सामने

अहमदाबाद व्यतिरिक्त, एकदिवसीय विश्वचषक 2023 चे सामने दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, धर्मशाला, लखनौ, पुणे, त्रिवेंद्रम आणि गुवाहाटी येथे होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने ईडन गार्डन कोलकाता आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला, तर टीम इंडियाचे पॉइंट टेबल किंवा ग्रुपमध्ये स्थान काहीही असले तरीही सेमीफायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच खेळली जाईल.

MS धोनीला कँडी क्रश खेळताना पाहिलं अन् तीन तासात 30 लाख चाहते तुटून पडले…

BCCI च्या अधिकाऱ्यांची बैठक

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सोमवारी बीसीसीआयचे अधिकारी आणि संबंधित राज्यांच्या क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांची अनौपचारिक बैठक झाली. मात्र, या बैठकीत आयसीसीच्या नियमांव्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतातील 12 मैदानांवर खेळवला जाणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीचे सामने ईडन गार्डन कोलकाता आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. त्याचवेळी भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली तर उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वास्तविक, गेल्या अनेक दिवसांपासून असे मानले जात होते की 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे ठिकाण लवकरच घोषित केले जाईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube