Download App

ठाकरे यांच्या मराठी सक्तीचा मोठा धाक, अमराठी व्यापारी शिकायला लागले मराठी बाराखडी

मनसेच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये दिसून आला.

  • Written By: Last Updated:

Marathi vs Hindi :  काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेच्या वापरावरून सामाजिक व राजकीय वाद निर्माण झाले आहेत. विशेषतः मीरा रोड परिसरात याचे तीव्र पडसाद उमटले. (Hindi) याच पार्श्वभूमीवर आता भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एक सकारात्मक आणि विधायक उपक्रम हाती घेतला आहे. मनसेकडून बोरिवली पश्चिम येथे अमराठी व्यापाऱ्यांसाठी ‘मराठीची पाठशाळा’ हा उपक्रम राबवण्यात आला.

मनसेच्या या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मुंबईत व्यवसाय करणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांना मराठी भाषा शिकवून त्यांचं स्थानिकांशी सुसंवाद अधिक सुलभ करणं हा आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात अनेक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि मनसे कार्यकर्त्यांसोबत बसून मराठीची बाराखडी, मूलभूत शब्द, आणि व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या वाक्यरचनांचं अध्ययन केलं.

खबरदार! मुंबईत मराठी माणसाला घर नाकाराल तर..मंत्री देसाईंचा बिल्डरांना थेट इशारा, निर्णय काय?

मनसेच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये दिसून आला. एका व्यापाऱ्याने सांगितलं, “इथं व्यवसाय करताना स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ही संधी मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला.” मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, “मराठी ही केवळ भाषा नाही, ती इथल्या मातीची ओळख आहे. जी लोकं इथे व्यवसाय करतात, त्यांनी स्थानिक भाषेचा आदर ठेवावा, हेच आमचं उद्दिष्ट आहे. आम्ही कोणावरही दबाव टाकत नाही, पण मराठी शिकण्याचा हा आग्रह निश्चितच पुढेही सुरू राहील.”

मराठी विरुद्ध हिंदी वादामुळे भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने गैरमराठी लोकांसाठी मोफत मराठी भाषेचे वर्ग सुरू करण्याची घोषणा केली आहे. भाजपचे प्रवक्ते आणि हिंदी साहित्य भारती महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. दयानंद तिवारी यांनी सांगितले की, ‘हे वर्ग दर रविवारी सांताक्रूझ आणि सायन येथे भरवले जाणार आहेत. यासाठी कोणीही नोंदणी करून मोफत मराठी शिकू शकणार आहे.’

भाजपकडून आयोजित वर्गांमध्ये मराठी स्वर, व्यंजने, उच्चार आणि दैनंदिन संभाषण शिकवले जाणार आहे. जे लोक चांगल्या प्रकारे मराठी शिकतात त्यांना ज्ञानेश्वरीचा हिंदी अनुवाद गिफ्ट दिला जाणार आहे. या वर्गामध्ये 35 ते 60 वयोगटातील ड्रायव्हर, भाजी विक्रेते, सुरक्षा रक्षक आणि व्यावसायिक यांना सहभागी होता येणार आहे.

 

follow us