Atrocity Case Registered Against Imtiaz Jaleel : निवडणुकीच्या निकालाच्या आधीच औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील उमेदवार उमेदवार इम्तियाज जलील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (Imtiaz Jaleel) भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी वरुन जलील यांच्यावर गुरुवारी ( ता. 21) रात्री उशीरा ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२०) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी इम्तियाज जलील आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस जालिंदर शेंडगे हे पंडित नेहरू महाविद्यालयातील बूथवर आपसात भिडले होते. यानंतर शेंडगे यांनी गुरुवारी रात्री उशीरा पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार जलील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अतुल सावेंनी निवडणुकीत पैसे वाटले, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप, थेट व्हिडिओच दाखवले
शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भारतनगर परिसरात केंद्रावर मतदान सुरु असताना इम्तियाज जलील हे 15 ते 20 जणांसह तेथे आले. त्यांनी मतदारांना धमकावण्यास सुरु केले. मी समजावण्याचा प्रयत्न केला असता मला जातीवाचक शिवीगाळ करुन अंगावर धावून आले. लाथाबुक्यांनी मारहाण केली. उपस्थित लोकांनी मला सोडवले.
इम्तियाज जलील विरुद्ध अतुल सावे लढत
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात इम्तियाज जलील विरुद्ध भाजपचे अतुल सावे अशी लढत होत आहे. इम्तियाज जलील यांनी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अतुल सावे यांच्याकडून दलित आणि मुस्लिम भागात पैशांचे वाटप करून त्यांना मतदानापासून रोखल्याचा आरोप केला होता. तसेच या विषयीचा व्हिडिओ देखील त्यांनी दाखवला होता.