औरंगाबाद पूर्व : MIM पुन्हा मदतीला येणार; ‘अतुल सावे’ तिसऱ्यांदा गुलाल उधळणार?

  • Written By: Published:
औरंगाबाद पूर्व : MIM पुन्हा मदतीला येणार; ‘अतुल सावे’ तिसऱ्यांदा गुलाल उधळणार?

निवडून आलेल्या आमदाराला हमखास लाल दिवा देणारा मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद पूर्व. 1995 मध्ये हरीभाऊ बागडे (Haribhau Bagade), 2009 मध्ये राजेंद्र दर्डा (Rajendra Darda), 2014 आणि 2019 मध्ये अतुल सावे (Atul Save) या आमदारांना आतापर्यंत लाल दिवा मिळाला आहे. हिंदू-मुस्लिम अशी संमिश्र लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघावर कधी काळी काँग्रेसचे वर्चस्व होते. पण 1980 हरिभाऊ बागडे यांनी हा मतदारसंघ जिंकला आणि तेव्हापासून हा भाजपचा बालेकिल्लाच तयार झाला.

2004 आणि 2009 हे दोन अपवाद सोडल्यास भाजपचेच (BJP) आमदार निवडून येत गेले. गत दोन टर्मपासून मंत्री अतुल सावे हेही येथून आमदार आहेत. एकेकाळी काँग्रेसला साथ देणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. भाजपला येथे थेट ‘एमआयएम’ कडून फाइट मिळत आहे. पण मुस्लिम उमेदवारांची संख्या एमआयएमला घेऊन दरवेळेस बुडते. त्यामुळे या मतदारसंघाचे यंदाचे चित्र काय असणार? हा मतदारसंघ काँग्रेसला जाणार की ठाकरेंना? (Will Raju Vaidya of Shiv Sena (Ubatha) be the candidate against BJP’s Atul Save in Aurangabad East Assembly Constituency)

पाहुया लेट्सअप मराठीच्या ‘ग्राऊंड झिरोच्या’ निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

2009 पर्यंत औरंगाबाग पूर्व मतदारसंघात शेजारच्या फुलंब्री तालुक्यातील अनेक गावे होती. या काळात 1985, 1990, 1995 आणि 1999 असे चार टर्म हरीभाऊ बागडे इथे निवडून आले. युतीच्या सरकारच्या मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही झाले. पण 2004 मध्ये काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी बागडे यांना पराभवाचा धक्का दिला.

2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर फुलंब्री या नव्या मतदरासंघाची निर्मिती झाली आणि हरिभाऊ बागडे तिकडे शिफ्ट झाले. इथे औरंगाबाद पूर्व मतदारसंघात लोकमत समुहाचे राजेंद्र दर्डा हे काँग्रेसकडून मैदानात उतरले होते. त्यांच्याविरोधात भाजपकडून भागवत कराड यांना उतरविण्यात आले. पण दर्डा यांनी पंधरा हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला. राजेंद्रबाबू यांना 48 हजार 190 मते मिळाली होती. तर कराड हे 32 हजार 665 मते घेऊ शकले. त्यावेळी अपक्ष सुभाष झांबड यांनी 17 हजार 276 मते घेतली होती.

औरंगाबाद मध्य : शिंदे-ठाकरे भांडत बसणार अन् MIM पुन्हा चार्ज होणार?

2014 पासून छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली. त्यात पूर्व आणि पश्चिममध्ये त्यांना यश येऊ शकले नाही. पण मध्य मतदारसंघातून इम्तियाज जलिल विजयी झाले. 2014 ला भाजपने पूर्व मतदारसंघातून ओबीसी समाजातील अतुल सावे यांना मैदानात उतरविले. त्यात सावे यांनी 64,528 मते घेऊन विधानसभेत प्रवेश केला. त्यांना एमआयएमचे डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांनी फाइट दिली होती. कादरी यांना 60 हजार 268 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे राजेंद्र दर्डा केवळ 21 हजार 203 मते घेऊ शकले. ते तिसऱ्या क्रमाकांवर राहिले. शिवसेनेच्या कला ओझा या अवघ्या 11 हजार 409 मते घेऊ शकल्या. 2019 मध्ये फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेवटच्या काही दिवसांत सावे राज्यमंत्री झाले.

2019 विधानसभेच्या निवडणुकीत अतुल सावे हे 93 हजार 966 मते घेऊन विजयी झाले. त्यांना एमआयएमचे अब्दुल गफार कादरी यांनीच दुसऱ्यांदा फाइट दिली. कादरी यांनी तब्बल 80 हजार मते घेऊ शकले. पण समाजवादी पक्ष, बसपाचाही उमेदवारही रिंगणात होता. या दोन्ही उमेदवारांनी नऊ हजार मते घेतली होती. मत विभाजानात कादरी हे विजयापर्यंत जाऊ शकले नाहीत. अतुल सावे हे आमदार झाले आणि महायुतीमध्ये दुसऱ्यांदा मंत्रीही झाले. त्यांच्याकडे सध्या गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण खाते आहेत. विधानसभेला भाजपचे वर्चस्व असले तरीही लोकसभा निवडणुकीत एमआयएमला पूर्व मतदारसंघाने पुन्हा एकदा साथ दिली. या मतदारसंघातून इम्तिजाय जलिल यांना 93 हजार मते मिळाली. ती चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे यांच्यापेक्षा हे खूप जास्त होते.

Ground Zero : बीडमध्ये ‘क्षीरसागर बंधू’ भिडणार; मराठा मतांवर ज्योती मेटेंची नजर

यंदा महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाटेला जाईल आणि अतुल सावे उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाने या जागेवर दावा ठोकला आहे. काँग्रेसही जागेसाठी आग्रही आहे. पण आता काँग्रेसचे येथे संघटन राहिलेले नाही. याचा अर्थ ठाकरे गटाही इथे संघटन मजबूत आहे असेही नाही. तरीही ठाकरेंकडून शहर संघटक आणि स्थायी समितीचे माजी सभापती राजू वैद्य पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. तर एमआयएमचे कादरी हेही तिसऱ्यांदा येथून मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. पण या मतदारसंघातून इम्तियाज जलिल हे स्वतः रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. जलिल हे मैदानात उतरल्यास सावे यांना ते टफ फाइट देतील.

या मतदारसंघात मुख्य अडचण आहे ती उमेदवारांची संख्या. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या नेहमीच जास्त राहिली आहे. 2009 ला तब्बल 28 उमेदवार रिंगणात होते. त्यात तेरा मुस्लिम उमेदवार होते. तर 2014 ला उमेदवारांची संख्या 30 होती. मुस्लिम उमेदवारांची संख्याही जास्त होते. 2019 ला तब्बल 35 उमेदवार रिंगणात होते. यात अपक्षांची आणि त्यातही मुस्लिम उमेदवारांची संख्या चारपेक्षा जास्त होती. त्यांनी दहा हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती. ही मतविभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडू शकते याचा अंदाज आताच लावणे अवघड आहे. त्यामुळे कोण निवडून येऊ शकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube